लाॅकडाउन असताना सोन्याचे भाव का वाढतायत? भविष्यात ‘असे’ राहतील भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सध्या देशव्यापी लॉकडाउन सुरु आहे.यामुळे सोन्याचे स्पॉट मार्केट पण बंद आहे पण फ्युचर्स मार्केट मात्र खुले आहे. सट्टेबाजांच्या मागणीमुळे बुधवारी वायदा व्यापारात सोन्याचे भाव ५६७ रुपयांनी वाढून ४५,८९२ रुपये प्रति १० ग्रॅम झाले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या कराराची किंमत जूनमध्ये ५६७ किंवा १.२५ टक्क्यांनी वाढून १६,७५०च्या लॉटमध्ये ४५,८९२ रुपये प्रति १० ग्रॅम इतकी झाली.

ऑगस्टच्या डिलिव्हरीचा पिवळा धातू ५४० रुपये म्हणजेच १.१९ टक्क्यांनी वाढून प्रति १० ग्रॅम ३१०१ चा लॉट ४६०३९ रुपयांवर बंद झाला. विश्लेषकांनी म्हटले आहे की सोन्याच्या किंमतीतील वाढ ही मुख्यत:सोन्याच्या वाढत्या मागणीमुळे झाली आहे.जागतिक पातळीवर न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे दर २.०९ टक्क्यांनी वधारून ते १,७२३ डॉलर प्रति औंस झाले.

Gold prices settle at 1-week high as BofA forecasts the metal will ...

दुसरीकडे, कोरेना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत घरात थांबल्यामुळे सण साजरे करणे आव्हानात्मक ठरत आहे. अक्षय तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील सर्वात शुभ दिवसांपैकी एक आहे, तो नशीब, भरभराट आणि सौभाग्य आणण्यासाठी ओळखला जातो. परंतु सोशल डिस्टंसिंग आणि लॉकडाउन मधील नियमांमुळे गोल्ड शोरूम सध्या बंदच आहेत.या प्रसंगी ग्राहकांना ऑनलाइन सुविधेशिवाय सोने खरेदी करण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही आहे.

सोन्यात गुंतवणूक करण्याची चांगली संधी
रेलीगेअर कमोडिटीच्या उपाध्यक्षा सुंधा सचदेवा यांच्या म्हणण्यानुसार सोन्याच्या किंमतीत वाढ होणे अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीला चांगला आधार मिळणार आहे. सोन्याची किंमत प्रति औंस १,६७० ने वाढली आहे, जी येत्या काही दिवसांत प्रति औंस १,८४० पर्यंत पोहोचू शकते. जर आपण सोन्यात गुंतवणूकीचा विचार करीत असाल तर आपण केंद्र सरकारच्या सार्वभौम गोल्ड बाँड योजनेत गुंतवणूक करू शकता. २० एप्रिलपासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. आपण या योजनेचा फायदा घरून घेऊ शकता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

आमच्या WhatsApp ग्रुपला Join व्हा

20200423_125851.gif

Facebook पेज Like करा

20200423_125922.gif

Leave a Comment