हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारत आणि चीनमधील सध्याच्या तणावामध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे. सेंट्रल बँक ऑफ चायना (Chinese Central Bank) पीबीओसी-पीपल्स बँक ऑफ चायनाने (PBoC- People’s Bank of China) आणखी एका भारतीय कंपनीचा हिस्सा खरेदी केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चीनच्या पीपल्स बँक ऑफ चायनाने आता एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेनंतर बजाज फायनान्स (Bajaj Finance) मध्ये गुंतवणूक केली आहे. बॅंक ऑफ चायनाने बजाज फायनान्समध्ये 1 टक्क्यांपेक्षा कमीचा हिस्सा विकत घेतला आहे. पीपल्स बँकेचे होल्डिंग 1 टक्क्यांपेक्षा कमी असल्याने स्टॉक एक्सचेंजला याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, या तिन्ही कंपन्यांमधील चिनी सेंट्रल बँकेची हिस्सेदारी इतकी कमी आहे की, त्यापासून आपल्याला कोणताही धोका असू शकत नाही.
बँक ऑफ चायना भारतीय कंपन्यांमधील हिस्सा का खरेदी करीत आहे?
इंग्रजी वेबसाइट बिझिनेस टुडेच्या वृत्तानुसार, पीपल्स बँक ऑफ चायना यांनी बजाज ग्रुपची कंपनी बजाज फायनान्स (Bajaj Finance) मध्ये हिस्सा घेतला आहे. मात्र, हा भाग एक टक्क्यापेक्षा कमी आहे. राहुल बजाज यांच्या नेतृत्वातील बजाज फायनान्शियल सर्व्हिसेसची ती सहाय्यक कंपनी आहे. गेल्याच महिन्यात पीपल्स बँक ऑफ चायनाने देशातील खासगी क्षेत्रातील दिग्गज असलेल्या आयसीआयसीआय बँकेत गुंतवणूक केली होती.
पीपल्स बँक ऑफ चायनाने यापूर्वी एचडीएफसी लिमिटेडमधील आपली हिस्सेदारी एक टक्क्यांहून अधिक वाढवल्याची बातमी आली होती, यावरुन बरेच वादविवाद झाले. बजाज फायनान्समधील गुंतवणूकीबरोबरच चिनी सरकारी बँकेने भारतात आपली तिसरी गुंतवणूक केली आहे.
तेव्हा आता असा प्रश्न पडतो की, भारतात चिनी कंपन्यांच्या गुंतवणूकीवर कोणतेही बंधन नाही आहे का ? तसेच दोन्ही देशांमधील सीमेवरील वाढत्या तणावामुळे अशा गुंतवणूकीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चीनी मध्यवर्ती बँकेच्या पहिल्या गुंतवणूकीनंतरच केंद्र सरकारने शेजारच्या देशांकडून येणार्या एफडीआय आणि परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकीचे नियम कठोर केले.
एस्कॉर्ट सिक्युरिटीचे संशोधन प्रमुख आसिफ इक्बाल यांनी एका वृत्त वाहिनीला सांगितले की, चिनी सेंट्रल बँकेकडे भरपूर निधी आहे आणि भारतासारख्या देशांच्या आर्थिक संस्थांमध्ये गुंतवणूक करून त्यांना आपला पोर्टफोलिओ मजबूत करण्याची इच्छा आहे.
बजाज फायनान्स ही भारतातील सर्वात मोठी नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी एक आहे. त्यांनी सांगितले की, बँकिंग क्षेत्रात गुंतवणूकीच्या नियमांनुसार कोणताही गुंतवणूकदार कोणत्याही बँकेत 15 टक्के पेक्षा जास्त वोटिंग राइट घेऊ शकत नाही आणि 5 टक्क्यांहून अधिक हिस्सा घेण्यासाठी त्यांना रिझर्व्ह बँकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
सेंट्रल बँक ऑफ चायनाने ही गुंतवणूक केव्हा केली याबद्दल माहिती नाही. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, बजाज फायनान्सचे शेअर्स मार्चमध्ये 4,800 रुपयांच्या शिखरावरुन 2,200 रुपयांपर्यंत घसरले आहेत.
1600 हून अधिक भारतीय कंपन्यांमध्ये चीनने 7500 कोटी रुपये गुंतवलले आहेत
एप्रिल 2016 ते मार्च 2020 या कालावधीत देशातील 1600 हून अधिक भारतीय कंपन्यांमध्ये चीनकडून एक अब्ज डॉलर्सची थेट गुंतवणूक (FDI) केली गेली आहे. सरकारी आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. चीनी कंपन्यांनी भारतीय कंपन्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे ही वस्तुस्थिती आहे का असा प्रश्न सरकारला पडला. सरकारी आकडेवारीनुसार, एएप्रिल 2016 ते मार्च 2020 या कालावधीत 1600 हून अधिक कंपन्यांना चीनकडून 102 कोटी 2.5 लाख डॉलर्स (1.02 अब्ज डॉलर्स) थेट परकीय गुंतवणूक (FDI) मिळाली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.