चंद्रकांत पाटलांना चोंबडेपणा करण्याची गरज काय?; हसन मुश्रीफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सध्या चांगलंच टीकेचं रान पेटलं आहे. दोघेही दररोज एकमेकांवर कोणत्याना कोणत्या कारणाने टीका करीत असतात. रविवारी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली. त्यावरून कोल्हापुरात भाजपचे कार्यकर्ते चांगलेच भडकले. त्यानंतर चंद्र्कांत पाटील यांनीही मुश्रीफ यांचा खरफुस समच्छर घेत त्यांना प्रति आव्हान केले होते. त्यास प्रतिउत्तर देत ते म्हणालेत कि, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर विकृत टीका करणाऱ्या जिंदालबाबत भाजपने भूमिका स्पष्ट करावी, एवढीच मी मागणी केली होती. यात चंद्रकांतदादांना चोंबडेपणा करण्याची गरज नव्हती.

राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील तू तू मै मै अजूनही संपलेली नाही. या दोन्ही नेत्यांच्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमवारी हसन मुश्रीफ म्हणाले, चंद्रकांतदादांकडे दोन नंबरचं पद आहे. तरीही त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात एक मतदार तयार करता आला नाही. मी पाचवेळा विधानसभा निवडणुकीत जिंकून आलो आहे. पुढच्यावेळी कदाचित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यसभेत जातील. त्यांच्या जागी चंद्रकांत पाटील नागपूरमधूनही विधानसभा निवडणूक लढवतील, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला आहे. चंद्रकांतदादांना तयार मतदारसंघात जाण्याची सवयच आहे. त्यांच्या या अफाट लोकप्रियेबाबत मला काहीच बोलायचं नाही,

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर भाजपच्या आयटीसेलच्या प्रमुखाने आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यावरून हसन मुश्रीफ यांनी माफी मागा नाही तर परिणामांना सामोरे जा, असा इशारा दिला होता. त्यावर मीडियाशी संवाद साधताना मुश्रीफ यांनी हे विधान केलं. मी फक्त मीडियासेल प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. याप्रकरणी भाजपने माफी मागावी अशी मागणी केली होती. पण चंद्रकांत पाटलांना एवढी मस्ती आली कुठून? त्यांची लायकी नाही, ते भित्रे आहेत. त्यांना कोल्हापुरातून पळून जावं लागलं आहे, अशी घणाघाती टीकाही मुश्रीफ यांनी केली.

You might also like