हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Economic Survey : 1 फेब्रुवारी रोजी देशाचा सर्वसाधारण Budget 2023 सादर केला जाणार आहे. यासाठी अवघे काही दिवसच बाकी आहेत. मात्र त्यापूर्वी संसदेत एक डॉक्युमेंट सादर केले जाते, ज्याला आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey) असे म्हणतात. जे 31 जानेवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामनकडून सादर केले जाईल. हे एक अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट असते. त्यामध्ये मागील वर्षाचा लेखाजोखा आणि आगामी वर्षासाठीच्या सूचना, आव्हाने आणि उपाय यांबाबतचा उल्लेख असतो.
हे जाणून घ्या कि, केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंथा नागेश्वरन यांच्या देखरेखीखाली आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey) तयार करण्यात येते. अर्थमंत्र्यांकडून ते संसदेत मांडले गेल्यानंतर मुख्य आर्थिक सल्लागार पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरेही देतील. या आर्थिक सर्वेक्षणात, सरकार आपल्या वित्तीय विकासाविषयी तसेच आर्थिक व्यवस्थापन आणि बाह्य क्षेत्रांबाबतची माहिती सांगते. सरकारच्या धोरणांचे आणि कार्यक्रमांचे काय परिणाम झाले आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर किती परिणाम झाला, याची माहितीही त्यामध्ये असते. 1950-51 मध्ये देशाचे पहिले आर्थिक सर्वेक्षण सादर केले गेले होते. 1964 पर्यंत आर्थिक सर्वेक्षण हे अर्थसंकल्पासोबतच सादर केले जात असत, मात्र यामध्ये बदल होत ते अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधीच सादर करण्यात येऊ लागले.
कोणाकडून बनवले जाते आर्थिक सर्वेक्षण
आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey) हे अर्थ मंत्रालयाकडून तयार केले जाते. ते तयार करण्याची जबाबदारी मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या आर्थिक विभागाकडे असते. या विभागाकडून सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागाराच्या देखरेखीखाली हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तयार केले जाते.
याचे महत्व काय आहे ???
आर्थिक सर्वेक्षणात केंद्र सरकारकडून देशाच्या आर्थिक आरोग्याबाबतची माहिती दिली जाते. याच्या माध्यमातून देशाची आर्थिक स्थिती कशी आहे? तिची प्रगती कशी आहे ??? याची माहिती सरकारकडून जनतेला सांगतली जाते. यासोबतच अर्थव्यवस्थेबाबतच्या सूचनाही सरकारला दिल्या जातात. मात्र, या सूचना स्वीकारणे सरकारला बंधनकारक नाही.
आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey) हे एक प्रकारे आपल्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचे काम करते. कारण यावरून देशाची अर्थव्यवस्था कशी चालली आहे आणि ती सुधारण्यासाठी काय करण्याची गरज आहे हे दिसून येते???
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiabudget.gov.in/economicsurvey/
हे पण वाचा :
PPF मधील गुंतवणूकीबाबत आले मोठे अपडेट, हे जाणून घेतल्याशिवाय गुंतवू नका पैसे
LIC Jeevan Azad : ‘या’ नवीन पॉलिसी अंतर्गत मिळतील अनेक फायदे, त्याविषयी जाणून घ्या
Budget 2023 : रेल्वे अर्थसंकल्प सामान्य बजटचा भाग बनण्याचा रंजक इतिहास जाणून घ्या
PIB Fact Check : केंद्र सरकार सर्व विद्यार्थ्यांना देणार मोफत लॅपटॉप, तपासा ‘या’ व्हायरल मेसेजमागील सत्यता
Layoffs : कोरोनानंतर आता मंदीची भीती… आयटी सेक्टरमध्ये कपातीची वेळ का आली ???