हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Layoffs : गेल्या काही महिन्यांपासून जगभरातील टेक कंपन्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. यामागे कारणही तसेच आहे. कारण सध्याच्या काळात टेक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. यावेळी अचानक कर्मचाऱ्यांना टर्मिनेशनचे ई-मेल मिळत आहेत. Microsoft आणि Google Alphabet सारख्या कंपन्यांनी तर एकाच झटक्यात हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. Meta आणि Amazon च्या बाबतीतही असेच काहीसे आहे. मात्र यामुळे आता हा प्रश्न उपस्थित होतो आहे की तंत्रज्ञानासारख्या या चमकदार क्षेत्रात कपातीची खरंच गरज आहे का ???
किती लोकांनी नोकऱ्या गमावल्या ???
एका मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी सुमारे 1,00,000 लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. मात्र 2023 मध्येही ते थांबण्याचे नाव घेईना. इंडस्ट्री जॉब ट्रॅकिंग वेबसाइट http://layoffs.fyi नुसार, यूएस मधील दोन डझनहून जास्त टेक कंपन्यांनी म्हंटले की,” ते 10 टक्के किंवा त्याहून जास्त कर्मचाऱ्यांना कमी करतील.” Layoffs
कोविड नंतर बिघडली परिस्थिती
जगभरातील टेक कंपन्यांमध्ये नोकर कपात का होत आहे??? या प्रश्नाच्या उत्तरात, तज्ञांनी सांगितले की,” कोविड महामारीच्या वेळी लादण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक टेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर हायरिंग केले होते. तेव्हा वातावरण अनुकूल होते. मात्र लॉकडाऊनचे निर्बंध संपून मार्केट सुरु होताच तंत्रज्ञान क्षेत्राची परिस्थिती बिघडू लागली. Layoffs
Salesforce चे सीईओ मार्क बेनिऑफ यांनी जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यातच आठ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. यावेळी मार्क बेनिऑफ म्हणाले की,” लॉकडाऊन दरम्यान लाखो लोकांनी वर्क फ्रॉम होम केले होते. त्यामुळे कंपनीची तंत्रज्ञानाची मागणी वाढत होती. मात्र जसजसे लोकं जसजशी पुन्हा ऑफिसेस मध्ये येऊ लागले तसतशी तंत्रज्ञानाची मागणी कमी झाली. Layoffs
मंदीची भीती
टेक कंपन्यांमधील या नोकर कपातीमागे आर्थिक मंदीचा युक्तिवादही केला जात आहे. ज्यामुळे कंपन्या लोकांना नोकरीवरून काढून टाकत आहेत. जागतिक मंदीमुळे ट्विटर एमेझॉन, गुगल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांकडून जागतिक स्तरावर कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा करण्यात आली आहे.
भारतीय टेक आणि एडटेक कंपन्यांनीही खर्चात कपात करण्यास सुरुवात केली आहे. युरोप आणि अमेरिकेत मंदी येणार असल्याच्या भीतीमुळे अनेक टेक कंपन्यांनी आपल्या बजटमध्ये कपात केली आहे. अशा परिस्थितीत, भारतातील आयटी क्षेत्रातही मंदीचे सावट आणखी गडद होणार आहे का??? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण एका मीडिया रिपोर्ट नुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भारतीय आयटी कंपन्यांकडून नवीन नोकऱ्यांसाठी 10 टक्के कमी जाहिराती देण्यात आल्या आहेत. Layoffs
भारतावर मंदीचा कसा परिणाम होणार का ???
भारतही जागतिक अर्थव्यवस्थेचा एक भाग असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच जगातील जवळपास सर्वच अर्थव्यवस्था एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे जगात जे काही घडेल त्याचा परिणाम भारतावरही होणार हे उघड आहे. मात्र ते कधी घडेल हे येत्या काळात दिसून येईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :
हे पण वाचा :
PPF मधील गुंतवणूकीबाबत आले मोठे अपडेट, हे जाणून घेतल्याशिवाय गुंतवू नका पैसे
LIC Jeevan Azad : ‘या’ नवीन पॉलिसी अंतर्गत मिळतील अनेक फायदे, त्याविषयी जाणून घ्या
Budget 2023 : रेल्वे अर्थसंकल्प सामान्य बजटचा भाग बनण्याचा रंजक इतिहास जाणून घ्या
PIB Fact Check : केंद्र सरकार सर्व विद्यार्थ्यांना देणार मोफत लॅपटॉप, तपासा ‘या’ व्हायरल मेसेजमागील सत्यता
Post Office च्या ‘या’ योजनेमध्ये पैसे गुंतवून मिळवा दुप्पट नफा !!!