Wednesday, March 29, 2023

कोट्यवधी फॉलोअर्स तरीही सोशल मीडिया का सोडत आहेत मोदी; ही दोन कारण असू शकतात

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रविवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर, फेसबुक सोडण्याचा विचार करीत असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांनाच धक्का दिला. त्यांनी लिहिले की, ‘मी या रविवारी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर सोशल मीडिया अकाउंट सोडण्याचा विचार करीत आहे’. तथापि, पंतप्रधानांनी त्यांच्या निर्णयामागील काय कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु याबद्दल अनेक तर्क वर्तविले जात आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पंतप्रधान मोदी सोशल मीडियामध्ये खूप लोकप्रिय आणि सक्रिय आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर पंतप्रधान मोदी ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे नेते आहेत. ट्विटरवर पंतप्रधान मोदींचे तब्बल 5 कोटी 33 लाख फॉलोअर्स आहेत. तर दुसरीकडे फेसबुकवर 4 कोटी 4 लाख फॉलोअर्स पंतप्रधान मोदींचे आहेत. इंस्टाग्रामबद्दल बोलायचं झालं तर तेथेही पंतप्रधान मोदींचे 30 कोटी फॉलोअर्स आहेत. या सर्वात मोठा प्रश्न अजूनही उरतो तो असा की, पंतप्रधान मोदींना सोशल मीडिया का सोडायचा आहे.
तर याची दोन कारण खालीलप्रमाणे असू शकतात

१)भारत आपले स्वतःचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाँच करणार आहे?
अलीकडेच डेटा आणि सर्व प्रकारच्या व्यवसाय विषयक हालचालींनवरून फेसबुक आणि गूगलशी झालेल्या वादानंतर भारताकडे स्वतःचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म देखील असावे अशी एक मागणी समोर आली होती. पंतप्रधानांच्या ट्वीटनंतर सोशल मीडियावरही आता याबाबत अटकळ बांधली जात आहे. पण अशी काही योजना असती तर सरकारने याबाबत अगोदरच कळवले असते. तथापि, पंतप्रधान मोदी यांचे सरकारही गोपनीयतेसाठी ओळखले जाते. सरकारने असे बरेच निर्णय यापूर्वी घेतले कि ज्याची कल्पना कोणालाही नव्हती.

- Advertisement -

२) सरकारचे पुढचे नैतृत्व म्हणून अमित शहा यांना प्रोजेक्ट करण्याची तयारी
गृहमंत्री अमित शहा सध्या सरकारमध्ये नंबर 2 ची भूमिका साकारत आहेत आणि ते संघटनेतही सर्वात शक्तिशाली आहेत. अमित शहा यांना पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात आहे. केंद्रात पुन्हा सरकार स्थापन झाल्यानंतर घेतलेल्या सर्व प्रमुख निर्णयांमध्ये अमित शहा मुख्य भूमिकेत दिसून आले. पंतप्रधान मोदी आतापर्यंत सोशल मीडियावर अनेक विषयांवर जनतेशी थेट संवाद साधत आहेत. तेव्हा यापुढे आता शाह ही भूमिका निभावणार का? असा प्रश्न साहजिक तयार होत आहे.

 

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.