योगी आदित्यनाथ यांचा मुंबईत रोड शो का? : संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | मुंबईत रोड शो कशासाठी करतायत. आमच्याकडील उद्योग अोरबडून नेणार असेल तर आमचा आक्षेप आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री दावोसमध्ये रोड शो करणार आहेत का? मग योगी आदित्यनाथ मुंबईत रोड शो का करत आहेत?, असा सवाल करतानाच हे राजकारणाचे धंदे सोडून द्या तसेच भारतीय जनता पार्टी पुरस्कृत राजकारण बंद करा, अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईत ते अनेक उद्योगपतींशी चर्चा करून उत्तर प्रदेशात गुंतवणूक नेणार आहेत. तसेच ते ताज हॉटेलबाहेर रोडशोही करणार आहेत. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांना फटकारले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री दावोसला जात आहेत. तिथे गुंतवणुकदारांची जागतिक परिषद असते. तिथे जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री रोड शो करणार आहेत का? गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दावोसच्या रस्त्यावर रोड शो होणार आहे का? मग यूपीच्या मुख्यमंत्र्यांना ताजमहल हॉटेल समोर रोड शो करण्याची गरज काय? हे राजकारणाचे धंदे बंद करा, असं संजय राऊत म्हणाले.

आपण आलात तुमचा सन्मान आहे. तुम्ही सन्माने निघून जा. उद्योगपतींशी चर्चा करा. तुमच्याविषयी प्रेम आदर आहे तो राहील. फक्त राजकीय उद्योग करू नका, असं राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांना सुनावले आहे.