हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री करायचं आहे असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी केलं होत. त्यामुळं आता राज्याच्या राजकारणात या चर्चेला तोंड फुटलं आहे. याच पार्श्वभूमीवर खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी आमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी लागणारी संख्याच नाही त्यामुळे यावर भाष्य करणं योग्य नसल्याचे म्हंटल आहे.
नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, कोणाला काहीही आवडेल परंतु तुमची तेवढी संख्या असली पाहिजे ना? आमच्याकडे संख्या नाही, जर आम्ही क्रमांक एकचा पक्ष असतो तर आमच्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही काही निर्णय घेतले असते. पण आज आमच्याकडं शक्ती नाही, संख्या नाही. त्यामुळं त्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.
फडणवीसांच्या 'त्या' भाषणाच्या दुसऱ्या दिवशीच पत्रकाराची हत्या; याचा संबंध काय लावायचा?
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/bgXluNRzR7#Hellomaharashtra @rautsanjay61
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) February 11, 2023
दरम्यान, गेल्या महिन्याभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी २ वेळा मुंबईत आले याबाबत शरद पवारांना विचारलं असता मुंबई महानगर पालिका निवडणूक जवळ आल्या असल्याने मोदी पुन्हा पुन्हा येत आहेत. महाराष्ट्राला काय ते देणार असतील आणि राज्याचे हित असेल तर त्यांना विरोध करायच आमचं काही कारण नाही परंतु इथं येऊन ते राजकीय भाषण करत असतील तर त्याचा विचार त्यांनीच करावा असं शरद पवार म्हणाले.