नवी दिल्ली । महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ला आपल्या कर्णधारपदाखाली चौथ्यांदा IPL चा चॅम्पियन बनवले. CSK ने 2018 नंतर पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद पटकावले त्यामुळे चाहत्यांना आनंद तर झाला असेलच मात्र त्यांच्या मनात एक भीती देखील होती की धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणे अचानक आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा करू शकेल. खरं तर, चाहते ज्याबद्दल घाबरले होते असे काहीच घडले नाही आणि धोनीने त्यांना एक आनंदाची बातमी दिली. सामन्यानंतर जेव्हा धोनीला विचारण्यात आले की,”तो पुढच्या वर्षी आयपीएल खेळणार का?” यावर तो म्हणाला की,” मी अजूनही खेळणे सोडलेले नाही.”
आयपीएल 2021 ची अंतिम सामना संपल्यानंतर, सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये हर्षा भोगलेने धोनीला पुढच्या वर्षी आयपीएल खेळण्याविषयी प्रश्न विचारला. त्याने ते चेन्नई सुपर किंग्ज आणि BBCI वर सोडले. तो म्हणाला की,”BBCI वर बरेच काही अवलंबून असेल. कारण लीगमध्ये 2 नवीन संघ येणार आहेत आणि CSK साठी काय चांगले होईल हे आपणच ठरवायचे आहे. माझ्या फ्रँचायझीला कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये अशी माझी इच्छा आहे.”
धोनीने रिटायरमेंटबाबत एक गमतीदार उत्तर दिले
या प्रश्नाला उत्तर देताना धोनी पुढे म्हणाला की,” मी CSK कडून खेळणार की नाही हे महत्वाचे नाही. आम्हांला खेळाडूंचा एक मजबूत कोअर ग्रुप तयार करणे महत्वाचे आहे. जेणेकरून फ्रँचायझीला त्रास सहन करावा लागणार नाही. कोअर ग्रुप बनवताना पुढील 10 वर्षे कोणता खेळाडू संघासाठी खेळू शकतो हे पाहावे लागेल. आमच्या फ्रँचायझीसाठी सर्वोत्तम काय आहे ते आम्हाला पाहावे लागेल.” त्याच्या उत्तराचा शेवट करत त्याने शेवटी असे सांगितले, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांचा आनंद वाढला.
रिटायरमेंट बाबततो म्हणाला की,”मी अद्याप खेळणे सोडलेले नाही.” असे बोलून धोनी हसायला लागला. आता त्यांच्या या विधानामागे काय दडले आहे? माही वगळता क्वचितच कोणी हे सांगू शकेल. मात्र त्याने चाहत्यांना नक्कीच आनंदी होण्याची संधी दिली.
आम्ही यावर्षी चांगला कमबॅक केला : धोनी
याशिवाय, धोनी म्हणाला की,” गेल्या वर्षी CSK प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकले नव्हते. पण यावेळी आम्ही चांगला कमबॅक केला. मला आनंद आहे की, आम्ही चॅम्पियन बनू शकलो. त्याचबरोबर त्याने CSK च्या चाहत्यांचे आभार मानले. धोनी म्हणाला की,”आपण कुठेही खेळायला जायला हवे. जेव्हा आम्ही दक्षिण आफ्रिकेतही खेळायला आलो होतो. तेव्हा तेथेही CSK ला मिळणारा सपोर्ट मोठ्या प्रमाणात होता. मला आता एक खेळाडू म्हणून हेच हवे आहे. मला CSK च्या सर्व चाहत्यांचे आभार मानायचे आहेत. आम्हाला दुबईत खेळताना असे वाटत होते कि आम्ही चेन्नईमध्ये खेळत आहोत.”