हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला गेला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. मात्र त्यातच आता भाजपला आणि केंद्रातील मोदी सरकारला आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार आहेत अशा चर्चा रंगल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद न्यायालयात आहे. या दोघांच्या राजकारणात निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्हही गोठवले. यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा फटका बसण्याची शक्यता असली तरी जनतेची सहानभूती त्यांना मिळत आहे. याशिवाय शिंदे गटाला भाजपचेच फूस आहे असाही प्रचार शिवसेना करत आहे. शिवसेनेच्या सध्याच्या परिस्थितीला भाजप जबाबदार असल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंना प्रमुख विरोधी पक्षनेताही करण्याचा चर्चाना उधाण आलं आहे. देशभरातील विरोधी पक्षनेते शरद पवार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, केसी चंद्रशेखर राव यांच्या पंक्तीत आता उद्धव ठाकरे दिसू शकतात. त्यासाठी ठाकरे गटाकडून एक विशेष प्लॅन देखील तयार करण्यात आल्याची चर्चा सुरु आहे.