शरद पवारांशी चर्चेनंतर उद्धव ठाकरे देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा?

Uddhav Thackeray Sharad Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारवर सरकार बरखास्तीबाबतचे संकट कोसळलेले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदाराची बैठक घेतली जात आहे. दरम्यान आज पवार यांच्याशी बैठकीत चर्चा झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याआधी उद्धव ठाकरे आपल्या उरलेल्या आमदारांसह खासदारांशी चर्चा केली जाणार आहे. तत्पूर्वी ठाकरे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी एकटे भेटून चर्चा करणार असून यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करणार आहेत.

पवारांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे सरकार बरखास्त करण्याची शिफारस आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करणार असून मुख्यमंत्री ठाकरे स्वत: राज्यपालांना याबाबत पत्र लिहणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.