हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू होत आहे. कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच नागपूर येथे अधिवेशन होत असल्यामुळे अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारची कसोटी लागणार आहे. स्वत: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या अधिवेशनाला उपस्थित राहणार असून 30 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात बेळगावपासून महापुरुषांच्या अवमानापर्यंतचे अनेक विषय गाजणार आहेत. हे अधिवेशन अनेक मुद्यांवरून वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नागपुरात होतात असलेल्या हिवाळी अधिवेशनात पहिला दिवस महत्वाचा मानला जातो. कारण पहिल्या दिवशी सत्ताधारी व विरोधकांच्यात अनेक मुढायांवरून खडाजंगी होते. राज्यात घडणार्या महत्वाच्या घटनांवरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जातो. तसेच महत्वाचे निर्णयही पहिल्या दिवशी घेतले जातात. तब्बल तीन वर्षांपासून यंदा नागपुरात होत असलेल्या या अधिवेशनात अनेक घडामोडी घडणार आहे.
हिवाळी अधिवेशनात विदर्भातील प्रश्न, महापुरुषांचा अपमान, शेतकरी आत्महत्या, महिलांची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादा या मुद्यांवरून विरोधकांकडून सरकारला घेरले जाणार आहे.
अधिवेशन काळात 7 हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार
नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी बाहेर जिल्ह्यातून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ताफे नागपुरात दाखल झाले आहेत. या ठिकाणी पोलीस आयुक्तालयाच्या मार्फत बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. अधिवेशनासाठी नागपूरात 7 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मोर्चांवर 2 हजार 900 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॅाच असणार असून
अधिवेशनावर 68 पेक्षा अधिक मोर्चे धडकणार
विधानभवनावर आज 68 पेक्षा अधिक मोर्चे धडकणार आहेत. धडकणाऱ्या या मोर्चाच्या सुरक्षेच्या नियोजनाचा आढावा काल नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतला आहे. विधानभवनावर धडकणारे मोठे मोर्चे झिरो माईल् स्टेशन येथे रोखण्यात येणार असून या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले असून कशा पद्धतीने पूर्ण सुरक्षा यंत्रणा असणार आहेत.