महिला आमदाराने भरसभेत युवकाच्या लावली कानशिलात; करत होता अश्लिल खुना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पटना, बिहार | महिला कितीही मोठ्या पदावर गेली तरी तिला संघर्ष करावाच लागतो. वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांना सामोरे जावे लागते. अशीच एक घटना बिहार मधील पटना शहरात घडली आहे. 30 जानेवारीला विधानसभा मतदारसंघातील क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन करण्यासाठी गेलेल्या महिला आमदाराला अशा वागणुकीचा सामना करावा लागला आहे. अश्लील खुणा करत असलेल्या युवकाला महिला आमदाराने स्टेज खाली उतरून कानशिलात लगावली.

आपल्या मतदार संघात क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन करण्यासाठी गेलेल्या महिला आमदाराला अशाप्रकारच्या वर्तणुकीला सामोरे जावे लागेल. यावेळी आणखी एक पुरुष आमदार या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ‘युवक सतत माझ्याकडे बघून अश्लील चाळे करत होता. यामुळे मी पाहून न पाहिल्यासारखे केले. त्याची यामुळेच हिम्मत वाढून त्याने कृत्य करणे चालू ठेवले. हे सहन न झाल्यामुळे मी त्याच्या कानाखाली वाजवली’. असे महिला आमदार माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.

समाजातून आणि राजकीय माध्यमातून युवकाची बचावणी करण्यासाठी काही गट सक्रिय झाले आहेत. महिला आमदारावर तक्रार न करण्यासाठी दबाव आणला गेला. आरोपी मानसिक दृष्ट्या आजारी असल्याने त्याने हे कृत्य केले. व तरीही आमदाराने सर्वांसमोर भरसभेट कानशिलात वाजवणे चुकीचे आहे. लोकांना आमदार मारत असतील तर लोकांनी कोणाकडे न्याय मागायचा? असा सवाल मतदारसंघातील लोक करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.