हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएलचा सध्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. युएईमध्ये सप्टेंबर महिन्यापासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. पण आयपीएल सुरु होणार असल्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंचा जळफळाट झालेला पाहायला मिळत आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर चांगलाच वैतागला असून ‘विश्वचषक खड्ड्यात गेला तरी चालेल, पण आयपीएल व्हायला हवी’ असे वक्तव्य केले आहे.
आयपीएलमुळे पाकिस्तानला फायदा नाही तर नुकसानच होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण आयपीएलमध्ये पाकिस्तानचा एकही खेळाडू नसेल. त्याचबरोबर आयपीएल सुरु असताना सर्व देशाचे खेळाडू स्पर्धेत खेळत असतील. त्यामुळे पाकिस्तान कोणत्याही मोठ्या संघाबरोबर मालिका खेळवू शकत नाही. त्यामुळे आयपीएल सुरु झाले तर पाकिस्तानचे दुहेरी नुकसान होणार आहे.
याबाबत शोएब म्हणाला की, ” भारत आणि पाकिस्तान मालिका होऊ दिली नाही. भारत आणि पाकिस्तान आशिया चषक स्पर्धेत खेळणार होते, पण ही स्पर्धाही रद्द करण्यात आली. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार होती, पण तीदेखील रद्द करण्यात आली. हे सर्व कसं घडतं आहे, ते मला माहिती आहे. पण या विषयाच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. एकवेळ विश्वचषक खड्ड्यात गेला तरी चालेल, पण आयपीएल मात्र व्हायला हवी. भारताने क्रिकेट वाचवलं पाहिजे, नाहीतर त्यांच्या पुढच्या पिढीली या गोष्टीचा फटका बसू शकतो.”
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in