हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतासह जगातील सर्व देश सध्या चीनमधून पसरलेल्या कोरोनाव्हायरसशी झुंज देत आहेत. कोविड -१९च्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या सध्या वाढत आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या सर्व गोष्टींमध्ये लोक आणखी एका खगोलशास्त्रीय घटनेमुळे घाबरले आहेत. आजकल सोशल मीडियावर असे अनेक रिपोर्ट्स येत आहेत, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की लवकरच पृथ्वीचा विनाश होईल आणि २९ एप्रिलपर्यंत जगाचा अंत होईल. बरेच लोक या बातम्यांबाबत काही व्हिडिओही शेअर करत आहेत. पण आपण अशा कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे अजिबात लक्ष दिले नाही पाहिजे. अशाप्रकारच्या दाव्यांमध्ये कोणतेही सत्य नाही आहे.
सोशल मीडियावर एका हवाल्याने एक मोठी खोटी बातमी पसरली आहे. या बातमी मध्ये असा दावा केला जयोत कि २९ एप्रिल रोजी जग संपेल. याच्या समर्थनार्थ काही फोटो आणि व्हिडीओही पसरवले जात आहेत. एक व्हिडिओ सध्या शेअर केला जात आहे ज्यामध्ये एक लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आले आहे की २९ एप्रिल रोजी जग संपेल.
दावा का केला जात आहे?
वास्तविक, अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने नुकतीच एक अधिसूचना प्रसिद्ध केली. यानुसार २९ एप्रिल २०२० पर्यंत पृथ्वीजवळून एक विशाल लघुग्रह निघून जाईल, जो हिमालयाच्या अर्ध्या आकाराचा असेल. मात्र, आता काही सोशल मीडिया युझर्स त्याबद्दल खोटे दावे करीत आहेत आणि फेक न्यूज़ना प्रोत्साहन देत आहेत. मात्र हे नक्की काय आहे ?
On April 29. asteroid 1998 OR2 will safely pass Earth by 3.9 million miles/6.2 million km. A @Daily_Express article implying there is a “warning” about this asteroid is false. A complete listing of all asteroid passes is always public at https://t.co/i6i8HwCDJq. Carry on!
— NASA Asteroid Watch (@AsteroidWatch) March 4, 2020
नक्कीच २९ एप्रिल रोजी, पृथ्वीवर एक प्रचंड उल्का पृथ्वीजवळून जाईल. नासाच्या मते, १९९८ ओआर २ नावाचा एक उल्का भूगर्भापासून १.८ दशलक्ष किमी अंतरावरून पुढे निघून जाईल. गेल्या ४०० वर्षात किंवा येत्या ५०० वर्षात इतक्या जवळपास कोणतीही उल्का आलेली नाहीये. परंतु यापासून पृथ्वी पूर्णपणे सुरक्षित राहील. यामुळे घाबरण्या सारखे काहीही नाहीये म्हणूनच २९ एप्रिल रोजी नासाने जगाचा अंत होणार असंल्याची घोषणा खोटी आहे.
इतकेच नाही तर नासाच्या Sentry Impact Risk Page वरही याचा उल्लेख नाही आहे.नासा चे हे पेज पृथ्वीवर परिणाम करणाऱ्या संभाव्य घटनांचे परीक्षण करते. इंटरनेटच्या प्रसार इतक्या वेगाने झालेला आहे कि तितक्याच वेगाने सोशल मीडियावर अफवा पसरवणेही सोपे झाले आहे. आमच्या फॅक्ट चेकमध्ये २९ एप्रिल रोजी जगाचा शेवट होणार हे चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आहे.
सावधगिरी बाळगा
सोशल मीडियावर या चालू असलेल्या बातम्यांचा कोणताही असा स्रोत नाही. म्हणून आपण देखील काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्याकडे एखादी बातमी असल्यास, त्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी या बातमीचे सत्यता काय आहे याचा विचार करा. ते फॉरवर्ड का केले जात आहे? त्याचा परिणाम काय होईल? जर संबंधित बातम्यांमुळे आपल्या स्वतःवर ताण येत असेल तर त्यास पुढे फॉरवर्ड करू नका आणि डिलीट करून टाका.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.