याहून वाईट वेळ अजून येणारेय, WHO प्रमुखांची जगाला चेतावणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डब्ल्यूएचओ प्रमुखांनी कोरोनाव्हायरसविषयी चेतावणी देताना असे म्हटले आहे की, ‘आणखी वाईट काळ येणे अजून बाकी आहे’. अशा परिस्थितीच्या संदर्भात ते म्हणाले की असेही काही देश आहेत ज्यांनी लॉकडाऊन लादण्यास सुरवात केली आहे.

डब्ल्यूएचओचे संचालक टेड्रॉस एडेनहॅम ग्रेब्रेयसिस यांनी मात्र भविष्यात हि परिस्थिती आणखीनच वाईट होईल असे त्यांना का वाटले हे मात्र स्पष्ट केले नाही. अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार कोरोना विषाणूची सुमारे २५ दशलक्ष लोकांना लागण झालेली आहे तर १.६६ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

WHO चीफ बोले- कोरोना वायरस की तेजी से ...

तथापि, काही लोकांनी हे संकेत दिले आहेत की भविष्यात हे संक्रमण आफ्रिकन देशांमध्ये पसरले जाईल, जेथे आरोग्य सुविधा अत्यंत कमकुवत आहेत. जिनिव्हा येथील पत्रकारांशी झालेल्या संभाषणात टेड्रॉस यांनी १९१८ च्या स्पॅनिश फ्लूशी कोरोना विषाणूच्या संसर्गाची तुलना केली. ते म्हणाले, ‘ही एक अतिशय धोकादायक परिस्थिती आहे आणि ही घटना घडत आहे … १९१८ मध्ये आलेल्या फ्लूप्रमाणेच, ज्यात जवळपास एक कोटी लोकांचा मृत्यू झाला होता.हा असा व्हायरस आहे ज्याला लोक अद्यापही समजु शकलेले नाहीत.’

ते म्हणाले, “पण आता आपल्या कडे तंत्रज्ञान आहे, आपण ही आपत्ती टाळू शकतो, असे होणारे प्रकार आपण टाळू शकतो.” टेड्रोस म्हणाले, ‘आमच्यावर विश्वास ठेवा. सर्वात वाईट काळ अद्यापही येणे बाकी आहे.ही आपत्ती थांबली पाहिजे.हा असा व्हायरस आहे ज्याला लोक अद्यापही समजु शकलेले नाहीत.

China's coronavirus death toll surges past 2,000: government ...

ते म्हणाले की डब्ल्यूएचओ सुरुवातीपासूनच कोरोना विषाणूच्या धोक्याविषयी चेतावणी देत ​​आलेला आहे.ते म्हणाले, ‘आम्ही पहिल्या दिवसापासून इशारा देत होतो की हा एक असा राक्षस आहे की ज्याच्याबरोबर आपण सर्वांनी एकत्र लढायचे आहे.’

त्याच वेळी अमेरिकेच्या संदर्भात टेड्रोस म्हणाले की कोरोना विषाणूच्या संबंधात पहिल्या दिवसापासून अमेरिकेतून काहीही लपविलेले नाही. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ते म्हणाले, “पहिल्या दिवसापासून अमेरिकेपासून काहीही लपलेले नाहीये.”

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment