मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी जी जर्सी घालण्यात येणार आहे त्याचा फोटो जडेजाने आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे. या जर्सीचा लुक हा 90 च्या दशकातल्या जर्सीसारखा आहे. हा फोटो शेअर करताना जडेजाने 90 च्या दशकाची आठवण, मला ही जर्सी खूप आवडली, असे कॅप्शन दिले आहे.
⏪Rewind to 90’s 👕 #lovingit #india pic.twitter.com/bxqB6ptfhD
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) May 29, 2021
पुढील महिन्यात 18 ते 22 जून रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया 2 जूनला इंग्लंडला रवाना होणार आहे. या मॅचसाठी निवड झालेले खेळाडू सध्या मुंबईमध्ये क्वारंटाईन झाले आहेत, यात जडेजाचा देखील समावेश आहे. जडेजाने आयपीएल 2021 मध्ये बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल झाल्यानंतर भारतीय टीम इंग्लंडविरुद्ध पाच टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.
टीम इंडियामध्ये कोणाकोणाचा आहे समावेश
रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, केएल राहुल, ऋद्धीमान साहा
राखीव खेळाडू : आवेश खान, अर्झान नागवासवाला, अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा