SBI नंतर ‘या’ बँकेने कमी केले होम लोनचे व्याज दर; आजपासून EMI होणार कमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनने (एचडीएफसी) शुक्रवारी १२ जूनपासून आपला रिटेल प्राइम लेंडिंग रेट हा २० बेस पॉइंटने कमी केला आहे. या वजावटीनंतर हा दर १६.२० % करण्यात आला आहे. या दरात कपात केल्याने एचडीएफसीच्या सध्याचे सर्व रिटेल होम लोन आणि होम-नॉन लोन ग्राहकांना याचा थेट फायदा होईल.

असे असतील नवीन व्याज दर
प्राइम लेन्डिंग रेट हा तो दर आहे ज्याद्वारे व्यावसायिक बँका त्यांच्या सर्वात विश्वासार्ह आणि क्रेडिट योग्य ग्राहकांना कर्जे देतात. या व्याजदरात २० बीपीएस कपात झाल्यानंतर आता एचडीएफसीचे नवीन व्याज दर हे ७.५-८.५% च्या दरम्यान असतील.

एसबीआयने कर्ज कमी केल्यानंतर हा निर्णय घेतला गेला
हे पाऊल स्टेट बँक ऑफ इंडियाकडे बघून उचलण्यात आले आहे. एसबीआयने एमसीएलआरमध्ये सलग १३वी कपात जाहीर केली आहे. यामुळे एसबीआयचे कर्ज आणखी स्वस्त होईल. यावेळी बँकेने एमसीएलआरमध्ये ०.२५ टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. गृहकर्ज घेतलेल्या लोकांना याचा फायदा होईल, असे बँकेने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

एसबीआयकडे आता ७% एमसीएलआर आहे
बँकेने जारी केलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे की, एमसीएलआर एक वर्षाच्या कालावधीसाठी ७.२५ टक्क्यांवरून ७ टक्के इतका करण्यात आलेला आहे. १० जूनपासून या नवीन निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. स्टेट बँकेने यापूर्वीच बाह्य बेंचमार्क लिंक्ड लेन्डिंग रेट (ईबीआर) तसेच रेपो रेट लिंक्ड लेन्डिंग रेट (आरएलएलआर) यांमध्ये ०.४० टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. बँकेने ईबीआरला ७.०५ टक्क्यांवरून वर्षाकाठी ६.६५ टक्क्यांवर आणले आहे, तर रेपो दराशी जोडलेले व्याज दर हे ६.६५ टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांवर आणले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment