आपल्यालाही SBI खात्यातून पैसे कट झाल्याचा एसएमएस मिळाला आहे ??? जाणून घ्या यामागील कारण

SBI
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : आजकाल प्रत्येकाकडे बँकेचे खाते आहे, जिथे आपण आपल्या कमाईचे पैसे जमा करतो. या खात्यांमध्ये जमा असलेल्या पैशांवर आपल्याला बँकेकडून व्याज देखील मिळते. तसेच हे पैसे काढण्यासाठी आपल्याला बँकेकडून एक एटीएम कार्डही दिले जाते. यासोबतच आपल्या खात्यातील खात्याशी संबंधित ट्रान्सझॅक्शनची माहिती मिळवण्यासाठी आपल्याला एसएमएसची सुविधा देखील दिली जाते. अनेकदा बँकांकडून आपल्या खात्यातून अचानक काही पैसे कट केल्याचा मेसेज आपल्याला मिळतो. जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे खातेदार असाल तर आपल्याला नुकताच 147.5 रुपये कट केल्याचा मेसेज मिळाला असेल.

SBI says no minimum balance penalty, SMS charges on all savings accounts | Mint

मात्र याबाबत काळजी करण्याचे काहीच कारण नाही. वास्तविक बँकेकडून कापले गेलेले हे पैसे आपल्या डेबिट कार्डचे शुल्क आहे. SBI कडून ग्राहकांना विविध प्रकारच्या डेबिट आणि क्रेडिट सुविधा पुरवल्या जातात. यामध्ये क्लासिक, सिल्व्हर, कॉन्टॅक्टलेस आणि ग्लोबल डेबिट कार्डचा समावेश आहे. हे लक्षात घ्या कि, डेबिट किंवा एटीएम कार्डसाठीचा वार्षिक देखभाल खर्च आणि सर्व्हिस चार्जच्या नावाखाली SBI कडून आपल्या खात्यातून दरवर्षी 147.5 रुपये कट केले जातात. जे वर्षातून फक्त एकदा द्यावे लागतात.

sbi-debit

बँकेला द्यावे लागते देखभाल शुल्क

ग्राहकांकडून SBI एटीएम/डेबिट कार्डसाठीचा देखभाल खर्च आणि सर्व्हिस चार्ज म्हणून 125 रुपये घेते. मात्र असे असुन आपल्या खात्यातून 147.5 रुपये कसे काय कापले गेले ??? असा प्रश्न ग्राहकांना भेडसावतोय. मात्र हे लक्षात घ्या कि, या 125 रुपयांच्या फीवर बँकेकडून 18 टक्के GST देखील आकारला जातो. म्हणजेच आपल्याला एकूण 22.5 रुपये GST म्हणून द्यावे लागतील. अशा प्रकारे, ग्राहकांनाकडून 125+22.5=147.5 रुपये घेतले जातात.

SBI Bank की ताज़ा खबरे हिन्दी में | ब्रेकिंग और लेटेस्ट न्यूज़ in Hindi - Zee News Hindi

इतर बँका देखील पैसे कापून घेतात

हे लक्षात घ्या कि, जवळपास सर्वच बँकाकडून एटीएम/डेबिट कार्डसाठी वार्षिक देखभाल खर्च आकारला जातो. उदाहरणार्थ, खाजगी क्षेत्रातील ICICI बँकेकडून त्यांच्या कोरल डेबिट कार्डसाठी 499 रुपये जॉइनिंग फी आणि देखभालीच्या नावावरही दरवर्षी तेवढीच रक्कम आकारली जाते. मात्र, इतर डेबिट कार्डांसाठी, ICICI बँकेकडून कोणतेही वार्षिक शुल्क आकारले जात नाही.

डेबिट कार्डसहीत इन्शुरन्स देखील उपलब्ध

हे जाणून घ्या की, बँकांकडून डेबिट कार्डांसोबतच ग्राहकांना पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स पॉलिसी देखील दिली जाते. या अंतर्गत ग्राहकांना 50 हजार ते 10 लाखांपर्यंतचे कव्हरेज दिले जाते. मात्र किती इन्शुरन्स कव्हर किती मिळेल ते कार्डाच्या प्रकारावर अवलंबून असेल. या अंतर्गत कार्डधारकाचा अपघातात मृत्यू झाल्यास हा इन्शुरन्स क्लेम त्याच्या कुटुंबाला दिला जातो. मात्र त्यासाठी अपघाताच्या 90 दिवस आधीपर्यंत कार्डने एकदा तरी ट्रान्सझॅक्शन करावे लागेल.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/personal-banking/information-services/kyc-guidelines/debit-card-related-charges

हे पण वाचा :
लवकरच लॉन्च होणार स्वस्त Electric Bike, एका चार्जिंगमध्ये मिळेल 135KM रेंज
BSNL मध्ये होणार मोठा बदल; सरकारने बनवलाय जबरदस्त प्लॅन
Kotak Mahindra Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, 7 दिवसांत तिसऱ्यांदा FD वरील व्याजदरात केली वाढ
Train Cancelled : रेल्वेकडून आज 261 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोने-चांदी झाले स्वस्त, आजचे दर तपासा