संजय राठोड यांचा राजीनामा तुम्हाला घ्यावाच लागेल; प्रविण दरेकर कडाडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी देखील तीव्र होत असताना दिसते आहे. भाजप नेते आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी देखील “तुम्हाला संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावाच लागेल अन्यथा बा भारतीय जनता पक्ष राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा दिलाय.

तसेच पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येचा छडा लावल्याशिवाय भाजप अजिबात स्वस्थ बसणार नाही. राज्याच्या एका मंत्र्याचे नाव त्या प्रकरणात नावं येते. तरीही मुख्यमंत्री त्या प्रकरणावर काहीही बोलतं नाहित. राज्य नेमकं कुठल्या दिशेने चाललंय, असा घणाघात देखील दरेकर यांनी केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री जोपर्यंत संजय राठोड यांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही असा पवित्रा भाजपने घेतला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात, संजय राठोड हे दोषी आहेत, अशा थेट आरोप भाजपने केला आहे. त्यामुळेच संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजप करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like