औरंगाबाद | कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जमावबंदी आदेश लागू असतांना देखील वाढदिवसा निमित्त गर्दी करण्याचा प्रकार घडला आहे. लोकप्रतिनिधींकडूनच असा प्रकार झाल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. वाढदिवशी गर्दी गोळा करून कोरोनाचे नियम पायदळी तुडविणाऱ्या जि.प.सदस्य,आजी-माजी सरपंचा विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बजाजनगरातील मोहटा देवी मंदिर चौकात विविध विकासकामांचे उद्घाटन करणारे जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश गायकवाड यांच्यासह आजी-माजी सरपंचावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंढरपूर येथील नवीन जिल्हा परिषद शाळेजवळ असलेल्या मोहटा देवी मंदिराजवळ वाढदिवसाचे औचित्य साधून विविध विकास कामांचे उद्घाटन ७ मार्चला जिल्हा परिषद सदस्य तथा स्थायी समितीचे सदस्य रमेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तसेच मास्क न लावणाऱ्या २५ ते ३० जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड, माजी सरपंच शेख अख्तर, हारूण चौधरी, महेबुब चौधरी, महेंद्र खोतकर, के.व्ही.गायकवाड, गणेश आव्हाड यांच्यासह २५ ते ३० जणांवर एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार खंडागळे करीत आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group