Thursday, March 30, 2023

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत वीज बिलात सूट देण्यासाठीचा प्रस्ताव येण्याची दाट शक्यता

- Advertisement -

मुंबई । राज्यात लॉकडाऊनच्या काळात अव्वाच्यासव्वा विजेची बिलं आल्याने अनेकांना फटका बसला होता. राज्यभरात वीज ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली होती. काही जणांना अंदाजे तर काही जणांना चुकीची बिलं पाठवल्याने मोठ्या प्रमाणात लोकांकडून असंतोष व्यक्त होत होता. सुधारित बिलं पाठवण्याची मागणी होत होती. दरम्यान, आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत वीज बिलात सूट देण्यासाठीचा प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे.

विजेचा युनिटच्या वापरानुसार वीज बिलात सवलत देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे. १० ते ३० टक्क्यांपर्यंत वीज बिलात सवलत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऊर्जा विभाग आज मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे. राज्यात एकूण 73 लाख घरगुती वीज ग्राहक आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव पारित झाल्यास वीज बिलात सूट दिली गेली तर वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल. दरम्यान, भाजप आणि मनसेने वीज बिलात सूट देण्याची मागणी सरकारकडे केली होती.

- Advertisement -

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”