मुंबई । केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशातील कोरोना संसर्गाच्या स्थितीबाबत माहिती देणारी आकडेवारी जाहीर करण्यात आली. आज दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेत ही आकडेवारी सांगण्यात आली. आकडेवारीनुसार देशातील काही भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत असल्याचा सकारात्मक ट्रेंड समोर आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
देशातील २३ राज्यांमधील ४७ जिल्ह्यांत गेल्या २८ दिवसांपासून करोनाचा एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. तर इतर ४५ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांपासून करोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. हे असे जिल्हे आहेत जिथे सुरुवातीला करोनाचे रुग्ण आढळून आले होते. दरम्यान, गेल्या २४ तासात देशभरात ९९१ कोरोनाची लागण झालेले नवे रुग्ण आढळले आहेत.
या नव्या रुग्णांच्या नोंदीनंतर देशातील करोनाग्रस्तांची संख्या १४ हजार ३७८ इतकी झाली आहे. तर कालपासून आजपर्यंत ४३ रुग्णांचा मृत्यू करोनाची लागण झाल्याने झाला आहे. अशी माहितीही लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.याचबरोबर देशभरात आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन ४८० जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरात १९९२ रुग्ण हे बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही अग्रवाल यांनी यावेळी स्पष्ट केलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”
इतर महत्वाच्या बातम्या –
या देशांमध्ये अद्याप एकही कोरोनाग्रस्त नाही, घ्या जाणुन
आता ८ एवजी १२ तासांची होणार कामाची शिफ्ट? कायद्यात होणार सुधारणा
मासे किंवा अन्य सीफूड खात असाल तर सावधान! UN ची चेतावणी
भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना दिलासा, सीएम ठाकरेंनी घेतला ‘हा’ खास निर्णय
सरकार हॅलिकोप्टरमधून टाकणार लोकांसाठी पैसे? जाणुन घ्या सत्य
ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा -www.hellomaharashtra.in