सांगलीत एसटीवरील सरकारच्या जाहिरातीही उतरवल्या, आचारसहिंतेमुळे केली कारवाई

संग्रहित छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने कारवाईचा बडगा उगारला आहे. आचारसंहिता भंग करणारे सांगली शहरातील अनेक राजकीय फलक पथकाने उतरवत एसटीवरील सरकारच्या जाहिरातीही उतरवल्या.

यावेळी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रचाराचे शासकीय बोर्ड ही पथकाने ताब्यात घेतले आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच महापालिका नितीन कापडणीस यांच्या आदेशाने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने रात्री उशिरापर्यंत शहरातील राजकीय प्रचार करणारे मोठे राजकीय नेत्यांचे फलक उतरवले. याचबरोबर आज सकाळ पासून अतिक्रमण विभागाने सांगली शहरातील अनेक भागातील डिजिटल पोश्टर आणि विविध पक्षांचे झेंडेही ताब्यात घेतले आहेत.

याचबरोबर एसटी महामंडळाच्या बसेसवर झळकणार्या शासनाच्या विविध योजनांच्या जाहिराती करणारे फलक अतिक्रमण पथकाने काढून टाकीत बस स्थानक आवारातील सुद्धा अनेक जाहिराती काढल्या आहेत. विशेष म्हणजे एसटीवरील शासकीय योजनांचा प्रचार करणाऱ्या जाहिराती आचारसंहिता लागल्यानंतरही तशाच होत्या याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र सांगली महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने जोरदार कारवाई करीत एसटी विभागालाही कारवाई करण्यास भाग पाडले आहे. तसेच सांगली महापालिकेचे पदाधिकारी यांच्या वाहने जमा करून घेतली आहेत व उद्या जिल्हाधिकारी यांच्या ताब्यात देणार असल्याचे माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली .