देशात कोरोनाग्रस्तांची संख्या २८ हजाराच्या दारात; २४ तासात सापडले १३९६ नवे रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही आहे. गेल्या २४ तासात देशभरात कोरोनाचे १ हजार ३९६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या नव्या देशातील रुग्णांची संख्या ही आता २७ हजार ८९२ इतकी झाली आहे. ३८१ रुग्णांना एकाच दिवसात डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत ६ हजार १८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याचसोबत रुग्णांचा बरे होण्याचा दर २२.१७ टक्के इतका असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. ते नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

देशातील १६ जिल्ह्यात गेल्या २८ दिवसापासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. तर ८५ जिल्हे असे आहेत जिथे मागील १४ दिवसांमध्ये करोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नसल्याचंही अग्रवाल यांनी सांगितलं. तसेच कोरोनाबाबत कोणतेही गैरसमज बाळगू नका. हा बरा होणारा आजार आहे. करोना झालेल्या रुग्णांकडे तुच्छ दृष्टीकोनातून पाहू नका.आपल्याला आरोग्य सेवा पुरवणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडे तिरस्काराच्या नजरेने पाहू नका असंही आवाहन अग्रवाल यांनी केलं. कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका, तसंच कोणत्याही धर्म किंवा पंथाला करोनाचं लेबल लावू नका. कोरोना कुणालाही होऊ शकतो. हा एक संसर्गजन्य आजार आहे. तो बरा होतो त्यामुळे कुठेही तेढ निर्माण होईल असं वातावरण निर्माण करु नका असंही अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment