पुणे । पुणे जिल्ह्यात आज दिवसभरत १७६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याबरोबरच जिल्ह्यात एकूण ७ हजार २६५ इतकी रुग्णसंख्या झाली आहे. ही माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून दिली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी मिळून इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात संचारबंदीचे नियम शिथिल केले असले तरी प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने विविध उपाय राबविले जात आहेत.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांपैकी नायडू महापालिका रुग्णालयात ११०, खाजगी रुग्णालयात ५३ आणि ससून मध्ये १३ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात सर्वत्र सामाजिक अलगावच्या नियमांचे पालन केले जात आहे. बाहेरून येण्यासाठी तसेच जिल्ह्यात प्रवासासाठीही पास गरजेचा करण्यात आला आहे.
दिवसभरात नवे १७६ कोरोनाबाधित !
पुणे शहरात आज नव्याने १७६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यात नायडू-महापालिका रुग्णालये ११०, खासगी ५३ आणि ससूनमधील १३ रुग्णांचा समावेश आहे. आजच्या १७६ रुग्णांसह पुणे शहरातील एकूण संख्या ७ हजार २६५ इतकी झाली आहे.#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 4, 2020
दरम्यान आज राज्यभरात एकूण २९३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ७७ हजार ७९३ इतक्यावर पोहोचली आहे. राज्यातील एकूण मृतांची संख्या २७१० इतकी झाली आहे. आज सुधारित शिथिल केलेल्या नियमांची यादी राज्य सरकारने जाहीर केली असून त्यात सामाजिक अलगाव सर्वाना बंधनकारक असल्याचे नमूद केले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.