ख्रिसमसच्या दिवशी या कंपनीच्या 1800 कर्मचाऱ्यांना बसणार मोठा धक्का! भारतात बंद होणार आहे प्लांट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । ऑटोमोबाइल कंपनी जनरल मोटर्स (General Motors) भारतातील आपला शेवटचा प्लांट पूर्ण बंद करणार आहे. हा प्लांट बंद होण्यासाठी भारत आणि चीन दरम्यानचा वाढता तणाव (India and China conflict) हे कारण आहे. जनरल मोटर्सचा हा प्लांट 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या दिवशी पूर्ण बंद होऊन जाईल. हे महाराष्ट्रातील तळेगांव (Talegaon) येथे आहे. हा प्लांट बंद झाल्यामुळे 1800 कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याचे संकट निर्माण झाले आहे. जीएम ने 1996 मध्ये भारतात आपला कारभार सुरू केला.

1800 कर्मचाऱ्यांचा जाणार रोजगार
महाराष्ट्र स्थित जनरल मोटर्स (General Motors) च्या प्लांटमध्ये जवळपास 1800 कर्मचारी काम करतात. आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या जनरल मोटर्सने आपल्या या प्लांटच्या विक्रीसाठी चीनची कंपनी ग्रेट वॉल मोटर्ससह जानेवारीमध्ये डील केलेली होती. मात्र भारत सरकारने या डिलला मंजुरी दिलेली नव्हती. कंपनीला अशा आहे की, या वर्षाच्या अखेरपर्यंत ही डिलमध्ये पूर्ण होईल. भारत आणि चीनच्या तणावा दरम्यान केंद्र सरकारने या डिलला परवानगी दिली नाही.

https://t.co/qrx7pMP3IA?amp=1

सरकारने गुंतवणूकीसाठी तयार केले नियम
खरं म्हणजे, लद्दाखमधील चीन आणि भारत मध्ये दरम्यानच्या काळात तणाव निर्माण झाला होता, त्यानंतर चीन तसेच तर शेजारील देशांच्या गुंतवणूकीसाठी सरकारने कडक नियम तयार केले. सरकारने शेजारील देशांकडून करण्यात आलेल्या सर्व गुंतवणूकीचे तपास करण्याचे आदेश दिले, त्यामागील उद्देश चीनमधून होणारी गुंतवणूक रोखणे हे आहे. सरकारने अनेक सेक्टर्समधील चीनी वस्तूंचा वापर करण्यावर पूर्णपणे बंदी घातलेली आहे. चीनबरोबरीला वादानंतर महाराष्ट्र सरकारच्या जीएम-ग्रेट वॉल आणि दोन अन्य कंपन्यांच्या डिलवर बंदी घातली आहे.

https://t.co/pS3RECPhoZ?amp=1

2017 मध्ये गुजरात मधील प्लांटची विक्री झाली होती
जनरल मोटर्स ने 2017 पहिले गुजरातच्या हलोल स्थित आपला एक प्लांट चीनची कंपनी SAIC ला विकला होता. आता MG मोटर्स या प्लांटचा वापर करत आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्याबद्दल जनरल मोटर्स म्हणाले की, ते आपल्या कर्मचाऱ्यांची पूर्ण काळजी घेतील. कंपनीचे म्हणणे आहे की,ते आपल्या कर्मचार्‍यांना पुढील महिन्यांपर्यंत पैसे देईल. या प्लांटमध्ये तयार झालेले Chevrolet Beat (शेवरले बीट) प्रामुख्याने मेक्सिकोमध्ये निर्यात केले गेले आहे, जे आता बंद झाले आहे.

https://t.co/JTnGLE3A0n?amp=1https://t.co/JTnGLE3A0n?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment