25 कोटी ग्राहकांना अवघ्या 149 रुपयांत मिळणार विमा, त्याचा तुम्ही कसा फायदा घेऊ शकता हे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर आपण PhonePe देखील वापरत असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे … होय, PhonePe युझर्स आता अवघ्या 149 रुपयांमध्ये विमा घेऊ शकतात. डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म PhonePe आपल्या युझर्सना ICICI Prudential Life Insurance च्या संयुक्त विद्यमाने ही सुविधा देत आहे. यामध्ये एक खास गोष्ट अशी आहे की, आपण ते कोणत्याही पेपरवर्क आणि मेडिकल चेकअप शिवाय घेऊ शकता. या विम्याचे काय फायदे आहेत ते जाणून घ्या –

विमा घेण्यासाठी किती उत्पन्न असावे?
जर आपणास हा विमा घ्यायचा असेल तर आपले वार्षिक उत्पन्न 1 लाख किंवा त्याहून अधिक रुपये असावे. या व्यतिरिक्त आपले वय 18 वर्ष ते 50 वर्षे असावे.

कोणत्याही पेपरवर्क शिवाय किती रुपयांचा विमा येईल?
जर तुम्हाला हा विमा कोणत्याही पेपरवर्क आणि मेडिकल चेकअप शिवाय घ्यायचा असेल तर तुम्ही 1 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंतची पॉलिसी घेऊ शकता. या व्यतिरिक्त, एक्सपायर झाल्यावर आपण PhonePe द्वारे ते रिन्यू देखील करू शकता.

आपण हा विमा कसा घेऊ शकता-

> अँड्रॉइड आणि आयओएसवरील PhoenPe अ‍ॅपच्या My Money सेक्शनवर क्लिक करा.
> यानंतर तुम्हाला Insurance वर क्लिक करावे लागेल.
> आता Term Life Insurance वर क्लिक करा.
> आता तुम्हाला इन्‍शुअर करायची रक्कम निवडा.
> स्वत: चे आणि नॉमिनी व्यक्तीचे बेसिक डिटेल्स भरा.
> फोनपेद्वारे ऑनलाईन पेमेंट करुन आपण पॉलिसी खरेदी करू शकता.

https://t.co/5zLAdSsO7u?amp=1

25 लाखांपर्यंत विमा घेता येतो
या विमा पॉलिसीअंतर्गत एखाद्याला 1 लाख ते 25 लाख रुपयांचा विमा मिळू शकतो. ग्राहक कोणत्याही आरोग्य तपासणीशिवाय फोनपे अ‍ॅप्लिकेशन वर त्वरित विमा पॉलिसी घेऊ शकतात. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, अकाली निधन झाल्यास लाखो फोनपे युझर्स आता त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक पेचप्रसंगातूनपासून वाचवू शकतात.

https://t.co/9KqfbJx5MY?amp=1

फोन पे वर 25 कोटी युझर्स आहेत
भारतात केवळ 2.73 टक्के लोकांचा विमा संरक्षण आहे. जागरूकता नसणे आणि पेपरपार्कच्या गडबडीमुळे अनेक लोकं विमा घेणे टाळतात. अशा परिस्थितीत Phonepe यांच्या पुढाकाराने विमा क्षेत्राची पोहोच वाढू शकते. देशभरात फोनपेचे 25 कोटीहून अधिक युझर्स आहेत.

https://t.co/O5ISa03g8S?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment