ST कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; शिंदे-फडणवीस सरकारकडून पगारासाठी 300 कोटी वितरीत

ST employees Eknath Shinde Devendra Fadnavis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत असल्यापासून या सरकारकडून अनेक हिताचे निर्णय घेतले जात आहेत. दरम्यान मकर संक्रातीचे औचित्य साधत शिंदे-फडणवीस सरकारने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा थकलेला पगार वितरित करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने 300 कोटी रुपये आज वितरीत करण्यात आले.

राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याला 10 तारखेला राज्य सरकारकडून पगार दिला जातो. मात्र, काही कारणांनी त्यांच्या पगाराला विलंब होतो. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांकडून आपले पगार वेळेत व्हॅव्हेट आणि त्यामध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. मात्र, त्याकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जात होते. दरम्यान आज सरकारच्यावतीने कर्मचाऱ्यांसंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली. त्यानुसार त्यांच्या वेतनासाठी सरकारकडून 300 कोटी वितरीत करण्यात आले.

अनेक मागण्यांसंदर्भात यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने आंदोलने करण्यात आली होती. महाआघाडीचे सरकार असताना कर्मचाऱ्यांनीआक्रमक पावित्रा घेत राज्यभर आंदोलने केली. मोठे आंदोलन करुनही त्यांच्या पदरी निराशाच पडली. राज्यात पुन्हा सत्ता बदल झाल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात हेही सरकार लक्ष देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला.

दरम्यान या सरकारच्यावतीने तात्काळ कर्मचाऱ्यांची नियमित पगाराची मागणी मान्य करत त्यांच्या खात्यावर पगार ठरलेल्या तारखेलाच जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज राज्य सरकारच्यावतीने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 300 कोटी रुपये आज वितरीत करण्यात आले.