हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । अत्यावश्यक वस्तूंचा कायदा (Essential Commodities Act) संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत झाला. तो पास झाल्यानंतर आता धान्य, डाळी, बटाटे, कांदे, खाद्यतेल अशा वस्तू जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीत येणार नाहीत. खरं तर, लोकसभेने 15 सप्टेंबर 2020 रोजी अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक 2020 ला मंजुरी दिली होती. आता ते राज्यसभेतूनही पुढे गेले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्यातील बदलांमुळे धान्य, खाद्यतेल, तेलबिया, डाळी, कांदे आणि बटाटे यासह कृषी अन्नपदार्थ कायद्यातून काढून टाकण्यात आले आहेत. याचा अर्थ असा आहे की, आता या सर्व कृषी खाद्यपदार्थावर सरकारचे नियंत्रण राहणार नाही आणि शेतकरी त्यांच्या मनाप्रमाणे किंमत निश्चित करुन पुरवठा आणि विक्री करू शकतील. मात्र, सरकार वेळोवेळी त्याचा आढावा घेत राहील. आवश्यकता भासल्यास नियम कठोरही केले जाऊ शकतील.
खालच्या सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना ग्राहक कामकाज, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले होते की,’ या विधेयकाद्वारे कृषी क्षेत्रातील संपूर्ण पुरवठा साखळी मजबूत होईल, शेतकर्यांना बळकटी मिळेल आणि गुंतवणूकीला प्रोत्साहन मिळेल.’ ते म्हणाले की,’यामुळे कृषी व्यवसाय क्षेत्रात अनुकूल वातावरण निर्माण होईल आणि वोकल फॉर लोकल आणखीनच वाढेल.”
मात्र, विरोधी पक्षांनी याला विरोध केला. ते परत करण्याची मागणी विरोधकांनी केंद्र सरकारकडे केली. असे मानले जाते की,’ हे विधेयक मंजूर झाल्यास खासगी गुंतवणूकदारांना नियामक हस्तक्षेपापासून स्वातंत्र्य मिळेल. या विधेयकाद्वारे शेतीतील संपूर्ण पुरवठा साखळी मजबूत होईल, शेतकऱ्यांचे मजबुतीकरण होईल आणि गुंतवणूकीला प्रोत्साहन मिळेल.
जीवनावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? (What is Essential Commodity Act) – या कायद्यांतर्गत येणाऱ्या सर्व वस्तूंची विक्री, किंमत, पुरवठा आणि वितरण यावर केंद्र सरकारचे नियंत्रण असते. त्याची जास्तीत जास्त किरकोळ किंमत (MRP) सरकार निर्धारित करते. मात्र काही गोष्टी अशा असतात की, त्याशिवाय आयुष्य जगणे कठिण असते. अशा वस्तू जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये समाविष्ट केल्या जातात.
जेव्हा जेव्हा केंद्र सरकारला हे समजते की, बाजारात मागणीनुसार विशिष्ट वस्तूची आवक खूपच कमी आहे आणि त्याची किंमत सतत वाढत आहे, तेव्हा ते ठराविक काळासाठी हा कायदा लागू करतात.
त्याची स्टॉक मर्यादा सेट करते. जो कोणी या वस्तूची विक्री करतो, मग तो घाऊक विक्रेता असो, किरकोळ विक्रेता असो की आयात करणारा, सर्वांना ठराविक रकमेपेक्षा जास्त साठा करण्यापासून रोखले जाते जेणेकरुन याचा कला बाजार होऊ नये आणि किंमती वाढू नयेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.