मोदी सरकारच्या ‘या’ योजनेचा फायदा 72 कोटी लोकांना झाला, तुम्हीही घेऊ शकता याचा लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । मोदी सरकारने नुकतेच वन नेशन वन रेशन कार्ड योजनेंतर्गत तामिळनाडू आणि अरुणाचल प्रदेश या दोन राज्यांची भर घातली. ऑक्टोबरपासून या दोन राज्यांतील कोट्यवधी लोकांना या वन नेशन वन रेशन कार्ड योजनेंतर्गत लाभ मिळू लागला आहे. ही दोन राज्ये सामील झाल्यानंतर आता देशातील 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रीय पोर्टेबिलिटी सुविधा सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकार 81 कोटी लोकांना कमी किंमतीत किंवा फ्रीमध्ये धान्य उपलब्ध करुन देत आहे. अरुणाचल प्रदेश आणि तामिळनाडूच्या सहभागामुळे जवळपास 72 कोटी लोक किंवा देशातील 85 टक्के लोकांना ही सुविधा मिळू लागली आहे.

अशाप्रकारे फायदा घेऊ शकता
वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी सारखी आहे. उदाहरणार्थ, एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जात असताना, आपल्याला केवळ नेटवर्क बदलण्याची आवश्यकता असते, परंतु मोबाइल नंबर मात्र तोच राहतो. अगदी त्याच प्रकारे यामध्ये आपले रेशन कार्ड देखील बदलले जाणार नाही. जर आपणास सोप्या भाषेत समजून घ्यायचे असेल तर आपण एका राज्यातून दुसर्‍या राज्यात गेल्यावरही आपले रेशन कार्ड वापरू शकता. तसेच याद्वारे आपण इतर राज्यांमधून देखील सरकारी रेशन खरेदी करण्यास सक्षम असाल. यासाठी कोणतेही नवीन रेशनकार्ड घावे लागणार नाही. आपली जुने रेशन कार्ड यासाठी पूर्णपणे वैध असेल.

योजनेचा फायदा कसा होईल?
वन नेशन वन रेशन कार्डाचा लाभ रेशन कार्ड असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मिळेल. त्याचा सर्वाधिक फायदा परप्रांतीय मजुरांना होणार आहे. याअंतर्गत शासकीय दराने आपण कोणत्याही राज्यातून धान्य विकत घेऊ शकता. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 नुसार सार्वजनिक वितरण प्रणालीच्या (PDS) च्या माध्यमातून देशातील 81 कोटी लोकांना रेशन दुकानातून तांदूळ तीन रुपये प्रति किलो दराने आणि गहू दोन रुपये प्रति किलो आणि एक रुपये प्रति किलो दराने तांदूळ खरेदी करता येते.

काही महत्त्वाच्या कागदपत्रांद्वारे तुम्ही याचा फायदा घेऊ शकता
वन नेशन वन रेशन कार्डचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे दोन महत्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. पहिले आपले रेशन कार्ड आणि दुसरे आधार कार्ड. तुम्हाला दुसर्‍या राज्यात जाऊन रेशन कार्डाचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची पडताळणी आधार क्रमांकाद्वारे होईल. प्रत्येक रेशन कार्ड दुकानात इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल डिव्हाइस असेल. याद्वारे लाभार्थीची आधार नंबरद्वारे पडताळणी केली जाईल.

31 मार्च 2021 पर्यंत या देशात 81 कोटीहून अधिक लाभार्थ्यांना जोडण्याची योजना आहे. या योजनेत सामील झाल्यानंतर देशातील निम्म्याहून अधिक लोकांना लाभ मिळणार आहे. 31 मार्च 2021 पर्यंत देशातील सर्व राज्यांना वन नेशन वन रेशन कार्ड योजनेत जोडले जावे, यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सर्व 81 कोटी लाभार्थ्यांना त्याचा लाभ पुन्हा सहज मिळू शकेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.