नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील कांझावाला भागात 1 जानेवारी रोजी एका 20 वर्षीय तरुणीवर झालेल्या हिट अँड रन प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आरोपीने आधी स्कूटीवरून जाणाऱ्या मुलीला धडक दिली आणि नंतर 2-3 वेळा कार पुढे-मागे करून मुलीला चिरडले, असे सांगण्यात येते. तरुणी गाडीखाली अडकल्याचे कारमधील तरुणांना माहीत होते, मात्र त्यानंतरही त्यांनी गाडी चालवणे सुरूच ठेवले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनीनुसार, 9 पोलिस नियंत्रण कक्ष (PCR) व्हॅनने कारचा पाठलाग केला परंतु ते त्या कारला पकडण्यात अयशस्वी झाले.
नवीन वर्षाची पार्टी आटोपून आपल्या मैत्रिणी निधीसोबत स्कूटीवरून घरी परतणाऱ्या अंजली सिंगला पहाटे दोनच्या सुमारास कारने धडक दिली. यानंतर तिचा पाय गाडीच्या एक्सलेटरमध्ये अडकला. रिपोर्ट्सनुसार, मुलगी ओरडत आणि रडत स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत राहिली, पण कारमध्ये बसलेल्या तरुणांनी तिला 13 किमीपर्यंत ओढले. कारमध्ये काहीतरी अडकल्याचे आरोपींना वाटले. त्याने बाहेर पाहिले असता त्याला मुलीचा हात दिसला, मात्र वाटेत एक पीसीआर व्हॅन (PCR) उभी असल्याचे पाहून त्याने पुन्हा मुलीला ओढण्यास सुरुवात केली. मुलीचा मृतदेह खाली टाकण्यासाठी कारने 4 पेक्षा जास्त वेळा यू-टर्न मारला. या वेदनादायक घटनेदरम्यान, कार चार पोलिस स्टेशन हद्दीतून, सुलतानपुरी, अमन विहार, प्रेम नगर आणि कांजवाला पोलिस स्टेशन परिसरातून गेली होती. अपघाताच्या वेळी अंजलीची मैत्रिण निधी ही अंजलीच्यासोबत स्कूटीवर होती, मात्र तिच्या मैत्रिणीची अवस्था पाहून ती कोणालाही न सांगता तिच्या घरी पळून गेली. सीसीटीव्हीद्वारे पोलिसांना तिचा शोध लागेपर्यंत निधी पुढे आली नाही.
अपघाताच्या 13 किलोमीटरच्या मार्गावर 5 पीसीआर व्हॅन उभ्या होत्या, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 5-6 पीसीआर कॉल करण्यात आले. पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षदर्शी दीपकशी 20 हून अधिक वेळा बोलले. त्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी एकूण 9 पीसीआर व्हॅन तैनात करण्यात आल्या होत्या आणि स्थानिक पोलीसही आरोपींचा शोध घेत होते, मात्र तरीही दिल्ली पोलिसांना आरोपींना घटनास्थळावरून पकडता आले नाही.
पहिला पीसीआर (PCR) कॉल रात्री 2:18 वाजता आला, ज्यामध्ये एका व्यक्तीने अपघाताबद्दल सांगितले. 2:20 ला आलेला दुसरा पीसीआर कॉल देखील अपघाताबद्दल होता. त्यानंतर रात्री 3.24 च्या सुमारास दीपकने 2 पीसीआर (PCR) कॉल केले, त्यांनी सांगितले की, कारमध्ये कोणाचा तरी मृतदेह लटकत आहे.
त्यानंतर 4:26 आणि 4:27 वाजता साहिल नावाच्या व्यक्तीने दोन पीसीआर कॉल केले आणि सांगितले की एका महिलेचा मृतदेह रस्त्यावर पडला आहे. त्या मार्गावर एकूण 5 पीसीआर व्हॅन (PCR) होत्या परंतु गंभीर कॉल पाहता एकूण 9 पीसीआर व्हॅन तैनात करण्यात आल्या होत्या परंतु पीसीआर कार आरोपींना शोधू शकली नाही कारण रात्री धुके असल्याचा दावा केला जात आहे आणि पीसीआर पोहोचण्यापूर्वीच कार निघून गेली होती. यासंदर्भातील अहवाल दिल्ली पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आला आहे.
हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती