लंडन । अभिनेत्री प्रियांका चोप्राने लंडनमध्ये नुकतेच तिच्या आगामी हॉलिवूड चित्रपट ‘टेक्स्ट फॉर यू ‘ चे शूटिंग पूर्ण केले. जेम्स स्ट्रॉस (James Strouse) दिग्दर्शित जर्मन भाषेतील सुपरहिट फिल्म ‘एसएमएस फर डिच’ पासून प्रभावित आहे. प्रियांका चोप्राने या संदर्भातील फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केले आहेत. तसेच शूटिंगच्या पूर्ण झाल्याची माहिती देखील दिली आहे. या फोटोजमध्ये तिच्याकडे चित्रपटाच्या स्क्रिप्टची एक कॉपी असल्याचेही दिसून येत आहे.
https://www.instagram.com/p/CJ1dpOJDHu6/?utm_source=ig_embed
प्रियांकाने सांगितले कि, कोविड सारख्या परिस्थितीतही सर्व टीम सोशल डिस्टंसिंग पाळत रोज काम करत होती.
https://www.instagram.com/p/CJ07YkLnxnF/?utm_source=ig_embed
प्रियांका सध्या रामीन बहरानी दिग्दर्शित ‘द व्हाईट टायगर ‘या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी करत आहे. याच नावाने प्रकाशित झालेल्या अरविंद अडिग यांच्या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर 22 जानेवारीला नेफलिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.