हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाणे येथील मनसेच्या उत्तर सगळे राज्यातील महाविकास आघाडी आणि प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. दरम्यान त्यांनी कालच्या जाहीर सभेत तलवार दाखवली होती. या कारणांमुळे आता राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणारा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काल मनसेच्या ठाण्यात झालेल्या सभेत राज ठाकरेंनी महाविकास आघाडीवर एक प्रकारे हल्लबोलच केला. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. कालच्या सभेनंतर नंतर आता राज ठाकरे आघाडीच्या निशाणावर आले आहेत.
कालच्या सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे, मंत्री जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.
नेमका काय घडला प्रकार?
ठाणे येथे काल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. या उत्तर’च्या सभेपूर्वी राज ठाकरे याचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यांना शाल, श्रीफळ देण्यात आले. या दरम्यान त्यांना एक तलवारही देण्यात आली. ती तलवार त्यांनी भर जाहीर सभेत म्यानातून बाहेर काढून दाखवली. या कारणामुळे भर सभेत तलवार दाखवल्याचे कारण सांगत राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.