नवी दिल्ली । ज्यांना शेअर बाजाराविषयी माहिती आहे त्यांना ब्रोकर हर्षद मेहता हे नवीन नाव नाही. हर्षद मेहता ही तीच व्यक्ती आहे जिने 1992 साली देशाच्या आर्थिक बाजारामध्ये पेच निर्माण केला. वर्ष 1991 मध्ये देशात आर्थिक सुधारणांची सुरूवातच झाली होती की, हर्षद मेहताने संपूर्ण खेळ फिरविला होता. 1990-1992 हे वर्ष भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी परिवर्तनाचा काळ होता. दरम्यान, आर्थिक बाजारात एवढा मोठा घोटाळा झाला की, शेयर्सची खरेदी तसेच विक्रीच्या प्रक्रियेत ऐतिहासिक बदल पाहिले गेले. 4 हजार कोटींचा हा घोटाळा हर्षद मेहता याने केला होता. या घोटाळ्यानंतर सेबीला (SEBI) शेअर बाजारातील गडबडी आणि धांधली कारभारावर लक्ष ठेवण्याचे अधिकार देण्यात आले.
कोण होता हर्षद मेहता?
29 जुलै 1954 रोजी गुजरातच्या राजकोटमधील पालेन मोती येथे जन्मलेल्या हर्षद मेहताचे बालपण मुंबईतील कांदिवली येथे गेले. होली क्रॉस बेरॉन सेकंडरी स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्याने लाजपत राय कॉलेजमधून बी.कॉम मध्ये पदवी प्राप्त केली. हर्षदने सुरुवातीला आठ वर्षे छोटी नोकरी केली. न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड येथे सेल्स पर्सन म्हणून त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर त्याने ‘हरिजीवन दास नेमिदास सिक्युरिटीज’ या ब्रोक्ररेज फर्ममध्ये काम केले. त्याच वेळी 1984 मध्ये हर्षदने स्वत: ची ‘ग्रो मोअर रिसर्च अँड अॅसेट मॅनेजमेंट’ ही कंपनी तयार केली. या बरोबरच त्याने ब्रोकर म्हणून बीएसई मध्ये मेम्बरशीपही घेतली. हर्षदने प्रसन्न परिजीवनदास यांच्या बरोबर राहून शेअर बाजारातील गुण शिकले होते. मेहताला शेअर बाजारातील ‘बिग बुल’ असे म्हणतात कारण त्याने ‘बुल रन’ सुरू केले होते.
घोटाळा कसा अंमलात आणला
हर्षद मेहताने बँकिंग नियमांचा फायदा घेत बँकांना काही न सांगता त्यांचे कोट्यावधी रुपये स्टॉक मार्केटमध्ये टाकत असत. तो दोन बँकांमधील मध्यस्थ म्हणून काम करायचा आणि 15 दिवस बँकांकडून कर्ज घेत असे. या कर्जाच्या पैशातून तो प्रचंड नफा कमावत असे आणि तो बँकेला परत करत असे. हर्षद एका बँकेतून बनावट बीआर बनवत असे आणि दुसर्या बँकेतून आरामात पैसे काढत असे. एप्रिल 1992 मध्ये हर्षदचा हा घोटाळा उघडकीस आला आणि बाजारात घसरण सुरू झाली. त्याच वेळी, मेहता यांच्यावर 72 फौजदारी आरोप ठेवण्यात आले आणि दिवाणी खटले दाखल करण्यात आले. 1990 साली स्टॉक मार्केटमध्ये मोठी तेजी आली होती, त्याचे मुख्य कारण ब्रोकर हर्षद मेहता होता. याच कारणास्तव त्याला शेअर बाजारामध्ये ‘बिग बुल’ असे नाव देण्यात आले.
इतकी शिक्षा मिळाली आणि असा मृत्यू झाला
हर्षदवर अनेक फौजदारी गुन्हे दाखल असले तरी 1992 च्या घोटाळ्याचा तो एकमेव दोषी असल्याचे दिसून आले. या घोटाळ्यात दोषी ठरल्यावर हायकोर्टाने त्याला पाच वर्षांची शिक्षा आणि 25 हजार रुपये दंड ठोठावला. हर्षदची प्रकृती खालावल्याने तो मुंबईतील ठाणे तुरूंगात शिक्षा भोगत होता. 31 डिसेंबर 2001 रोजी त्याच्या छातीत दुखू लागले आणि त्याला ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. तिथेच उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.
कुटुंबीयांकडून करण्यात आली वसुली
या घोटाळ्याच्या 25 वर्षानंतर याची वसुली हर्षदच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली. त्याच्या कुटुंबीयांनी हर्षदची संपत्ती विकली आणि बँका तसेच आयकराच्या नावावर 6 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा केली. त्याचवेळी हर्षदच्या कुटुंबीयांनी सन 2017 मध्ये 614 कोटी रुपये बँकेत भरले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.