नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमधील पाथर्डी या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये कर्जबाजारीपणा आणि देणेकऱ्यांच्या सततच्या तगाद्याला कंटाळून एका नवदाम्पत्याने आत्महत्या (Suicide) केली आहे. गौरव जगताप आणि नेहा जगताप असे आत्महत्या करणाऱ्या नवदाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आत्महत्येची (Suicide) नोंद करण्यात आली आहे. या दाम्पत्याने आत्महत्या करण्याअगोदर सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ही नोट पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
जोडप्याने कर्ज घेतले होते
नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील अनमोल नयनतारा गोल्ड सोसायटीत हे जगताप दाम्पत्य राहत होते. या जोडप्याने एका व्यक्तीकडून कर्ज घेतले होते. हे पैसे परत करण्यासाठी ती व्यक्ती सतत मागे लागली होती. तसेच पैसे परत करण्यासाठी धमक्याही देत होता. अखेर या सगळ्या जाचाला कंटाळून या जोडप्याने आपले आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. असे त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड (Suicide) नोटमध्ये म्हटले आहे.
‘अशी’ उघडकीस आली घटना
गौरवच्या मावशीने त्याला कॉल केला होता, त्याने उचलला नाही. मग तिने नेहाला कॉल केला तिनेही उचलला नाही. वारंवार फोन लावूनही फोन उचलले नाहीत म्हणून मावशीने गौरवच्या भावाला सांगितले. दोघेही फोन उचलत नसल्याने घरी जाऊन पहायला सांगितले. गौरवचा भाऊ घरी आला आणि बराच वेळ दारावर बेल वाजवत होता. मात्र आतून कोणताही प्रतिसाद येत नव्हता. यानंतर त्याच्या भावाने सोसायटीतील लोकांना बोलावून याबाबत सांगितले आणि दरवाजा तोडला. दरवाजा उघडून आत जाऊन पाहिले असता दोघे पती-पत्नी गळफास (Suicide) घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. यानंतर याची माहिती इंदिरानगर पोलिसांना देण्यात आली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस सुसाईड नोटच्या आधारे पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती