हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना धमकीचे पत्र आले आहे. नवाब मालिक आणि त्यांच्या कुटुंबियांना मारण्याची धमकी पत्राच्या माध्यमातून देण्यात आली आहे. अत्यंत अश्लील भाषेत हे पत्र पाठवले असल्याने या संदर्भात मालिक यांनी गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात वाईट भाषा वापरण्यात आलेली आहे. गप्प बसा नाहीतर केबिनमध्ये घुसून बलात्कार करू, अशी धमकी पत्राद्वारे देण्यात आली आहे. संबंधीत पत्र मुंबईतील कफ परेड इथे राहणार्या अभिजित बनसोडे याने पत्र पाठवले आहे. मात्र पत्र पुण्यावरून पोस्टाने आले असल्याने बोगस नावाने पत्र पाठवले असण्याची शक्यता आहे.
मलिक यांच्याकडून अनेक दिवसांपासून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले जात आहेत. तसेच मलिक दररोज पत्रकर परिषदेच्या माध्यमातून समीर वानखेडे आणि आर्यन प्रकरण याबाबत नवीन खुलासे करायला लागले आहेत. त्याच अनुषंगाने मलिकांना पत्र पाठविण्यात आले आहे. समीर वानखेडे यांच्याबद्दल बोलणे थांबवा असेही त्या पत्रात म्हटले आहे. आता मलिकांनी या संबंधीत तक्रार गृहमंत्र्यांकडे केली आहे.