सीट बेल्ट न लावल्याने अडवलं; म्हणून चालकाने पोलिसालाच गाडीच्या बोनेटवरून फरफटत नेले

जोधपूर : वृत्तसंस्था – जोधपूरमध्ये वाहतुकीच्या नियमांचं पालन घेणे एका पोलीस कर्मचाऱ्याला (Traffic Police) चांगलेच महागात पडले आहे. यामध्ये एका कारचालकाने ट्रॅफिक पोलीस (Traffic Police) अधिकाऱ्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत गाडी पळवली. यामुळे पोलीस कर्मचारी (Traffic Police) गाडीच्या बोनेटवर पडला. मात्र तरीही चालक थांबला नाही आणि सुमारे 500 मीटर अंतरापर्यंत गाडी चालवत नेली. यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या दोन मोटारसायकलस्वारांनी आपली दुचाकी समोर लावून ती कार थांबवली आणि त्या पोलीस अधिकाऱ्याचा जीव वाचला.

ही संपूर्ण घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कारचालक गजेंद्र सालेचा याच्याविरुद्ध कार्यालयीन कामात अडथळा आणण्यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार जोधपूरच्या देवनगर पोलीस स्टेशन परिसरात हि घटना घडली आहे. रविवारी पाल लिंक रोडवर असलेल्या शाळेसमोर वाहतूक पोलीस हवालदार (Traffic Police) गोपाल विश्नोई ड्युटीवर होते. इतक्यात समोरून एक कार आली. कार चालकाने सीट बेल्ट लावला नव्हता. यावर हवालदार गोपाल विश्नोई यांनी कारचालकाला कार थांबवायला सांगितली.

गाडीचा चालक गजेंद्र सालेचा या तरुणाने आधी गाडी थांबवली आणि पोलीस शिपाई (Traffic Police) गोपाल विश्नोई यांच्याशी वाद घातला. नंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात गाडीच्या समोर उभा गोपाल विश्नोई यांना धडक लागली आणि ते गाडीच्या बोनेटवर पडले. हे सर्व पाहूनही त्या तरुणाने लक्ष दिलं नाही आणि गाडी चालवतच राहिला. हे पाहून पोलिसाने (Traffic Police) गाडीचा वायपर पकडत बोनेटवर टिकून राहाण्याचा प्रयत्न केला. तरीही चालक पर्वा न करता गाडी पुढे चालवत राहिला. या घटनेची माहिती मिळताच देवनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी जयकिशन यांनी घटनास्थळ गाठून कारचालक गजेंद्र सालेचा याच्याविरुद्ध कार्यालयीन कामात अडथळा आणण्यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

हे पण वाचा :
एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे अनेक शिवसैनिक नाराज, जोरदार घोषणाबाजी करत व्यक्त केला संताप

भिवंडीत कॅशियरनेच बारमधील गल्ल्यावर मारला डल्ला, CCTV फुटेज आले समोर

दुचाकीसह पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडाले पती-पत्नी, Video आला समोर

बनावट क्रिप्टो एक्सचेंजने फ्रॉडद्वारे भारतीय गुंतवणूकदारांचे लुटले 1000 कोटी रुपये – रिपोर्ट

पुढंच्या एका तासात राज्यात काय घडत बघा; राणेंचा इशारा