Viral: पोलिसांच्या छाप्यादरम्यान लढाऊ कोंबडीच्या हल्ल्यात पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मनिला । फिलिपिन्समध्ये एका कोंबडीने एका पोलिस कर्मचारयाच मृत्यू केल्याची घटना समोर आली आहे. कोंबड्यांच्या बेकायदेशीर लढाईत छापा टाकणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावरच एका कोंबडीने हल्ला केला ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. या फायटर कोंबड्याच्या पायामध्ये ब्लेड लावलेला होता आणि ज्यामूळे पोलिस अधिकाऱ्याची पायाची धमनी कापली गेली. यामुळे पोलिस अधिकारी लेफ्टनंट ख्रिश्चन बोलोक यांचा मृत्यू झाला. असे सांगितले जात आहे की बोलॉक हा कोंबडाबाजीच्या बेकायदेशीर खेळाविषयी पुरावे गोळा करण्यासाठी तेथे गेला होता.

डेली मेलच्या वृत्तानुसार, नोर्दन समर पोलिसांचे प्रमुख कर्नल आर्नेल आपड यांनी सांगितले की, या घटनेत कोंबडीच्या पायाला लावलेला धारदार ब्लेड ख्रिश्चन बोलोकच्या डाव्या मांडीच्या धमनीमध्ये अडकला आणि त्याने तो कापला गेला. यामुळे पोलिस कर्मचार्‍याच्या पायातून बरेच रक्त बाहेर पडले आणि रुग्णालयात नेताना त्याचा मृत्यू झाला. फिलीपिन्समध्ये कोंबडीच्या लढाइला ‘तुपडा’ असे म्हणतात जो तिकडे खूप लोकप्रिय आहे. लोक त्यावर बरेच पैसेही खर्च लावतात आणि तो एक जुगार म्हणून प्रसिद्ध आहे.

https://twitter.com/MailOnline/status/1321095755361386498?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1321095755361386498%7Ctwgr%5Eshare_3&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fworld%2Fviral-fighting-cock-kills-police-officer-during-raid-in-the-philippines-dlaf-3314005.html

कोंबड्यांच्या पायांना ब्लेड लावतात
या लढाई दरम्यान, ब्लेडने बनलेला एक काटा कोंबडीच्या पायात ठेवला जातो, ज्यास गॅफ असे म्हणतात. या लढाईत बर्‍याचदा कोंबडी मारली जाते. कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यानंतर या प्राणघातक लढाईवर तसेच इतरही अनेक खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. पोलिस प्रमुख म्हणाले, “ही दुर्दैवी घटना आहे आणि ही एक अत्यन्त दुर्दैवी अशी गोष्ट आहे जी मी समजावून सांगू शकत नाही.”

आपुद म्हणाले की, या दुर्दैवी घटनेची माहिती जेव्हा मला पहिल्यांदा मिळाली तेव्हा मला विश्वास बसला नाही. माझ्या 25 वर्षांच्या पोलिस सेवेत मी पहिल्यांदाच कोंबडीच्या लढाई दरम्यान पोलिस कर्मचारी गमावला. सॅन होसे शहरातील या छाप्या दरम्यान तीन लोकांना अटक करण्यात आली असून दोन कोंबड्या जप्त केल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

Leave a Comment