मुलाच्या हातात स्टेअरिंग देणं पडलं महागात, अपघातात बापलेकाचा दुर्दैवी अंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली : हॅलो महाराष्ट्र – कराड – रत्नागिरी राज्य महामार्गावरील कोकरुड या ठिकाणी एक भीषण अपघात (accident) झाला आहे. वारणा नदीवर असलेल्या कोकरुड- नेर्ले पुलावर रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलाच्या दुभाजकाला कार धडकून हा अपघात (accident) झाला आहे. या अपघातात बापलेकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
ऋषिकेश घोगरे हे कार घेऊन पत्नी रेणुका, चुलत भाऊ महेंद्र, रुपाली, आरव व शिवेंद्र हे सर्वजण सकाळी पुण्यावरून गणपतीपुळे, रत्नागिरी येथे देवदर्शनाकरिता निघाले होते. दुपारी कोकरूड येथील वारणा नदीवरील कोकरूड-नेर्ले पुलाजवळ आले असता ऋषिकेश याचा कारवरील ताबा सुटल्याने पुलाच्या संरक्षण कठड्याला कारची जोरदार धडक झाली आणि हा भीषण अपघात (accident) झाला.

महेंद्र अशोक घोगरे आणि आरव महेंद्र घोगरे अशी या अपघातात मृत पावलेल्या बापलेकांची नावे आहेत. रुपाली महेंद्र घोगरे, शिवेंद्र महेंद्र घोगरे व रेणुका ऋषिकेश घोगरे अशी जखमींची नावे आहेत. या अपघातातील (accident) जखमींना उपचारांसाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. पोलिस उपनिरीक्षक संजय पाटील या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
‘कांतारा’ फेम अभिनेता चेतन अहिंसावर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल
अचानक कारच्या चाकाखाली आली बाईक, 10 फूट अंतरापर्यंत फरफटत गेला तरुण
KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपघात; पायाची नस कापली
IRCTC च्या वेबसाईटद्वारे अशा प्रकारे बुक करा तिकिटे
Indian Army मध्ये नोकरीची संधी; काय आहे पात्रता?