कोरोना संकट काळात RBI कडून या बँकेवर कारवाई; ग्राहकांना खात्यावरुन पैसे काढण्यास मनाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील कानपूर येथील पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेची कमकुवत झालेली आर्थिक स्थिती पाहता आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सहा महिन्यांकरिता या बँकेतील नवीन कर्ज तसेच ठेवी स्वीकारणे बंद केले आहे. आरबीआयने ११ जून रोजी याबाबतची माहिती दिली आहे. आरबीआयने सांगितले की, पीपल्स सहकारी बँक सहकारी बँकेतून पैसे काढण्याची सुविधा त्या बँकेतील कोणत्याही ठेवीदारास मिळणार नाही.

पीपल्स को-ऑपरेटिव्ह बॅंकेवर आली आहेत ही निर्बंध- आरबीआयने जारी केलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आलेले आहे की, १० जून २०२० रोजी व्यवसाय बंद झाल्यानंतर बँक रिझर्व्ह बँकेच्या लेखी परवानगीशिवाय या बँकेला आता कोणतेही नवीन कर्ज देणे तसेच जुन्या थकबाकीचे नूतनीकरण करता येणार नाही. याशिवाय बँक आता कोणतीही नवीन गुंतवणूक करू शकणार नाही किंवा नवीन ठेवी स्वीकारु शकणार नाही. तसेच रिझर्व्ह बँकेने या सहकारी बँकेला आपल्या कोणत्याही मालमत्तेची विक्री,त्याचे हस्तांतरण किंवा त्याची विल्हेवाट लावण्यास मनाई केलेली आहे.

केंद्रीय बँकेने म्हटले आहे की, विशेषत: सर्व बचत खाते किंवा चालू खाते किंवा ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातील एकूण शिल्लक रक्कम यावेळी काढू दिली जाऊ शकणार नाही. या सूचना १० जून रोजी व्यवसाय बंद झाल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत लागू राहतील आणि त्यांची समीक्षा केल्या जातील. मात्र, या सहकारी बँकेचे बँकिंग लायसन्स रद्द झाले ही अफवा पसरू देऊ नये, असे देखील रिझर्व्ह बँकेने यावेळी स्पष्ट केलेले आहे. आपली आर्थिक स्थिती जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत बँक या लागू केलेल्या निर्बंधांसह आपला बँकिंग व्यवसाय सुरू ठेवेल.

मे महिन्यात रद्द झाला आणखी एका बँकेचे लायसन्स – आरबीआयने मे महिन्यात महाराष्ट्रातील सीकेपी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला होता. महाराष्ट्रातील या सहकारी बँकेवरील आर्थिक अडचणींमुळे आरबीआयने हा निर्णय घेतला. ३० एप्रिलपासून आरबीआयने या बँकेची सर्व कामे थांबविली आणि गुंतवणूकदारांचा निर्णय वाचवण्यासाठी रिझर्व्ह बँकेला हा निर्णय घ्यावा लागला. आर्थिक अस्थिरतेच्या आधारे आरबीआयने या बँकेचे लायसन्स रद्द केले आहे. सध्या बँका ह्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत असून आर्थिक पेचप्रसंगातून जात आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment