नवी दिल्ली । अदानी ग्रुपला देशातील तीन विमानतळ मिळाले आहेत. यासाठी विमानतळ प्राधिकरण (AAI) आणि अदानी समूह (ADANI GROUP) यांच्यात कन्सेशन करार झाला आहे. या कराराअंतर्गत अदानी ग्रुप जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम या विमानतळांवर काम करेल. कमर्शियल ऑपरेशनसाठी या कन्सेशन कराराचा कालावधी 50 वर्षे असेल.
सुत्रां कडून मिळालेल्या माहितीनुसार विमानतळ प्राधिकरणाने अदानी ग्रुपबरोबर कन्सेशन करारावर स्वाक्षरी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कराराअंतर्गत जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांचे टेकओव्हर शक्य आहेत. हे अधिग्रहण पुढील 6 महिन्यांत होऊ शकते. याअंतर्गत, अदानी ग्रुप आता जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांच्या ऑपरेशन्स, मॅनेजमेंट आणि डेव्हलपमेंट साठी जबाबदार असेल.
मुंबई विमानतळावरही अदानी ग्रुपला मिळाल्याच्या बातम्या आल्या
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, अलीकडेच मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळही अदानी ग्रुपकडे देण्यात आल्याची बातमी आली. केंद्र सरकारने यास मान्यता दिली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, केंद्र सरकारच्या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने या विमानतळामध्ये 26 टक्के सहभाग घेत याला मान्यता दिली आहे.
सर्वात मोठी विमानतळ व्यवस्थापक कंपनी असल्याचे अदानीचे उद्दीष्ट आहे
विशेष म्हणजे, उद्योगपती गौतम अदानीच्या अदानी ग्रुपचे उद्दिष्ट देशातील सर्वात मोठे विमानतळ व्यवस्थापक होण्याचे आहे. मुंबई विमानतळ हे देशातील दुसरे सर्वात व्यस्त विमानतळ आहे. यासंदर्भात अदानी एन्टरप्राईजेसने स्टॉक एक्सचेंजला पाठविलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, जीव्हीके विमानतळ विकासकांचे कर्ज संपादन करण्यासाठी अदानी एअरपोर्ट होल्डिंगनेही करार केला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.