काबूल । अफगाणिस्तानात भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली आहे. दानिश न्यूज एजन्सी रॉयटर्समध्ये काम करायचा. काही दिवस ते कंदहारमधील सद्यस्थितीला कव्हर करत होते. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, शुक्रवारी दानिश तालिबानी लढाऊ सैनिक आणि अफगाण सैन्य यांच्यातील युद्धाला कव्हर करीत होते. यावेळी त्यांची हत्या करण्यात आली. दानिश हे भारतातील रॉयटर्स पिक्चर्स टीमचे प्रमुखही होते.
अफगाणिस्तानचे राजदूत फरीद ममुदे यांनी शुक्रवारी आपल्या ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे. दानिश सिद्दीकीचा मृतदेह कंदहारच्या स्पिन बोल्डक भागातून सापडला आहे. त्याच्या डोक्यावर आणि हातावर बंदुकीच्या गोळ्या लागल्या आहेत. हा खून कोणी केला आणि त्यामागचे कारण काय होते याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
13 जुलै रोजी या रेस्क्यू मिशनची माहिती ट्विटरवर देण्यात आली
अफगाणिस्तानाची स्पेशल फोर्सेसची टीम रेस्क्यू मिशनवर असताना दानिश त्यांच्यासमवेत उपस्थित होते. दानिशने 13 जुलै रोजी आपल्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट केली होती. यात त्याने सांगितले की,” तो अफगाणिस्तानमध्ये अनेक मोर्चांवर लढणाऱ्या अफगाण स्पेशल फोर्ससह आहे.” त्याने लिहिले कि- ‘मी या जवानांसह एका मिशनवर आहे. आज या फोर्सेस कंदहारमध्ये रेस्क्यू मिशनवर होत्या. या आधी ही लोकं रात्रभर एका कॉम्बॅट मिशनवर होते.”
THREAD.
Afghan Special Forces, the elite fighters are on various frontlines across the country. I tagged along with these young men for some missions. Here is what happened in Kandahar today while they were on a rescue mission after spending the whole night on a combat mission. pic.twitter.com/HMTbOOtDqN— Danish Siddiqui (@dansiddiqui) July 13, 2021
स्पेशल फोर्सेसच्या मिशनवर रिपोर्टिंग केले होते
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, दानिश सिद्दीकी हे दिवस अफगाणिस्तानच्या स्पेशल फोर्सेसच्या मिशनवर काम करत होते. या मिशन दरम्यान अफगाण सैन्याने आपल्या साथीदारांपासून विभक्त झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याला वाचवले होते. तरीही त्याने तालिबानशी लढा सुरूच ठेवला. दानिशने या रिपोर्टिंगमध्ये अफगाण सैन्य दलाच्या ताफ्यावर तालिबान्यांनी रॉकेट द्वारे कसा हल्ला केला आणि त्यानंतरची परिस्थिती काय आहे हे दर्शविले होते.
अफगाणिस्तानच्या राजदूतांनी व्यक्त केला शोक
अफगाण राजदूत फरीद मामुंडजे यांनी ट्वीट केले की,”काल रात्री कंदहार येथे एक मित्र दानिश सिद्दीकीच्या हत्येच्या बातमीने मनापासून दु: खी झाले. भारतीय पत्रकार आणि पुलित्झर पुरस्कार विजेता दानिश अफगाण सुरक्षा दलांचे कव्हरेज करत होता. काबूलला जाण्याच्या दोन आठवड्यांपूर्वीच मी त्याला भेटलो. त्याचे कुटुंब आणि रॉयटर्स यांना सहानुभूती.
दानिश सिद्दीकीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात एक टीव्ही रिपोर्टर म्हणून केली होती. नंतर तो फोटो जर्नलिस्ट झाला. रोहिंग्या निर्वासितांच्या असाधारण कव्हरेजबद्दल दानिश सिद्दीकीला सन 2018 मध्ये पुलित्झर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.
रॉयटर्सने व्यक्त केले दुःख
रॉयटर्सचे अध्यक्ष मायकल फ्रिडेनबर्ग आणि मुख्य संपादक एलेसॅन्ड्रा गॅलोनी यांनी दानिश सिद्दीकीच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला. “दानिश सिद्दीकी एक उत्कृष्ट पत्रकार, एक निष्ठावंत पती, वडील आणि खूप प्रिय सहकारी होता. या भीषण घटनेच्या वेळी त्यांच्या कुटुंबियांबद्दल आम्ही संवेदना व्यक्त करतो,” असे रॉयटर्सने एका निवेदनात म्हटले आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा