अजित पवारांनंतर जयंत पाटलांना डेंग्यूची लागण; ट्विट करत दिली माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटातील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना डेंगूची लागण झाली आहे. याबाबतची माहिती स्वतः जयंत पाटील यांनी ट्विटरवर पोस्ट करून दिली आहे. ऐन सणासुदीच्या काळात जयंत पाटील यांना डेंगू झाल्यामुळे कार्यकर्त्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच, जयंत पाटील यांनी पूर्ण बरे होई पर्यंत पूर्ण आराम करावा, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.

डेंगूची झाल्याची माहिती देत आपल्या ट्विटमध्ये जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, “कालपासून मला ताप आलेला असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आज डेंग्यूची तपासणी केली. थोड्या वेळापूर्वीच त्याचे रिपोर्ट आले असून मला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवस विश्रांती घेऊन मी शक्य तितक्या लवकर माझ्या दैनंदिन व पक्ष कामकाजाला सुरवात करेन”

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील डेंग्यूची लागण झाली होती. या आजारपणामुळे अजित पवार यांना अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवता आला नाही. परंतु आता त्यांची प्रकृती ठीक झाल्यामुळे ते सार्वजनिक ठिकाणी येऊ जाऊ लागली आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण झाली आहे. जयंत पाटील हे शरद पवार गटातील महत्वाचे नेते असल्यामुळे त्यांनी लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. तसेच, ऐन निवडणुकीच्या तोंडावर जयंत पाटील यांचे लवकर बरे होणे तितकेच महत्त्वाचे आहे.