अहमदनगर प्रतिनिधी | जिल्ह्यात ‘सारी’चे (सिव्हीअर अॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस) ११ एप्रिलपासून ते आजपर्यंत ४२ रुग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय आणि महात्मा फुले जीवनदायी योजने अंतर्गत मान्यता दिलेल्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यामध्ये २३ पुरुष, १५ महिला आणि ४ मुलांचा समावेश आहे. तर ‘करोना तपासणीच्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यांपैकी २१ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल आज प्राप्त झाले असून ते निगेटीव्ह आले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी ही माहिती दिली.
जिल्ह्यामध्ये ‘करोना’ रुग्णांच्या शोधाबरोबरच आता ‘सारी’ रुग्णांचेही तत्काळ निदान व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. ‘सारी’ व ‘करोना’ची लक्षणे ही जवळपास सारखीच आहेत. त्यामुळेच ‘सारी’चा रुग्ण ‘करोना’चा आहे का, हे तपासण्यासाठी ‘सारी’च्या रुग्णांचे स्वॅब घेतले जात आहेत. ‘करोना’चे संक्रमण थांबविण्यासाठी ‘सारी’च्या रुग्णांवरही बारीक लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत २७ करोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत. करोना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत १ हजार २१५ व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १ हजार १४५ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. काल पाठवलेले १३ आणि आज पाठविण्यात आलेले २० असे ३३ स्त्राव अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. ज्या अहवालाची प्रतीक्षा आहे त्यामध्ये १४ दिवस पूर्ण केलेल्या आणखी दोघा परदेशी नागरिकांचा समावेश आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”
इतर महत्वाच्या बातम्या –
कोरोनाच्या संकटात आता ‘सारी’ने चिंता वाढवली; औरंगाबादमध्ये १० जणांचा बळी
२० एप्रिलनंतर टाळेबंदीत शिथिलता? पहा काय म्हणतायत राजेश टोपे
सोन्याच्या किंमतीने मोडले सर्व रेकोर्ड, जाणुन घ्या आजचे भाव
SBI ने ४० करोड ग्राहकांना केले अलर्ट, ‘या’ फेक वेबसाईट पासून रहा सावधान
धक्कादायक! सोलापूरात कोरोनाचे १० नवे रुग्ण
खरंच..! कोरोना चीनच्या प्रयोगशाळेत तयार झाला होता?
ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा -www.hellomaharashtra.in