हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Airtel : भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या भारती एअरटेलचे बहुतेक प्रीपेड प्लॅन्स हे Jio आणि Vodafone Idea (VI) सारखेच आहेत. मात्र याचा अर्थ असा काढू नका की, एअरटेल इतर टेलिकॉम कंपन्यांचे प्रीपेड प्लॅन्स कॉपी करत आहे. एअरटेलकडूनही असे काही प्लॅन्स ऑफर केले जातात जे इतर कोणतीही टेलिकॉम कंपन्या देत नाहीत.
चला तर मग आज आपण एअरटेलच्या अशा दोन प्लॅनबाबतची माहिती जाणून घेउयात जे इतर कोणत्याही कंपनीकडे नाहीत …
699 रुपयांचा प्लॅन
Airtel च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये 56 दिवसांच्या व्हॅलिडिटी सह डेली 3 जीबी डेटा मिळेल. याशिवाय, कंपनी प्लॅनमध्ये ऑनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेली 100 SMS देखील देत आहे. आता आपण म्हणाल या प्लॅनमध्ये नवीन काय आहे? या प्लॅनमध्ये काय वेगळे आहे हे सांगण्यापूर्वी जरा इतर प्लॅन्सची माहिती घ्या …
999 रुपयांचा प्लॅन
Airtel कडून 999 रुपयांचा प्लॅन देखील मिळत आहे. यामध्ये यूझरला 84 दिवसांसाठी डेली 2.5GB डेटा मिळेल. यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस देखील दिले जातात.
Amazon प्राइम फ्री मेंबरशिप
Airtel च्या या प्लॅन्सची खास गोष्ट अशी कि यामध्ये आपल्याला Amazon ची प्राइम मेंबरशिप फ्री मध्ये दिली जात आहे. 699 च्या या प्लॅनमध्ये 56 दिवसांची मेम्बरशिप दिली जात आहे तर दुसऱ्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची मेम्बरशिप दिली जात आहे. याशिवाय यूझर्सना Airtel Xstream Mobile Pack, Apollo 24/7 Circle, Free HelloTunes आणि Wink Music Free सारख्या सुविधा देखील मिळतील.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.airtel.in/recharge-online
हे पण वाचा :
Jio च्या ‘या’ प्लॅन्समध्ये 3GB डेटासह मिळणार Disney Plus Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन !!!
EPFO मध्ये ई-नॉमिनेशन कसे करावे ते जाणून घ्या
Aadhar Card संबंधित सर्व सेवा आता घरपोच मिळणार !!!
UPI द्वारे एका दिवसात किती पैसे पाठवता येतील हे जाणून घ्या