मुंबई। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल रात्री ९ वाजता लोकांना घरात दिवे लावून कोरोनाविद्धच्या लढ्यात एकजूट असल्याचं दाखवण्यास सांगितलं होत. पंतप्रधानांच्या आवाहनाला काल देशभरात प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र, काही अतिउत्साही नागरिकांनी रस्त्यावर झुंडीने येऊन फटाके वाजवून कालच्या उपक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयन्त केला. अशा महाभागांवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
”राज्यात कोरोनारुग्णांची संख्या दररोज शेकडोंनी वाढत आहे. मृत्यूंची संख्याही वाढत आहे. तरीही परिस्थितीचं गांभीर्य काही जणांच्या लक्षात येत नाही, हे दुर्दैवं आहे. पंतप्रधानांनी दारात, खिडकीत दिवे लावायला सांगितलं असतानाही, मशाली पेटवून लहान मुलं, महिलांना सोबत घेऊन झुंडीनं रस्त्यावर उतरणं, फटाके वाजवून आगीला कारणीभूत ठरणं, हा बेजबाबदारपणाचा कळस आहे. यापुढे तरी सर्वांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
टाळेबंदीमुळे देशाची, राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत आली असली तरी त्यावर नंतरच्या काळात मात करता येईल, परंतु आता कोरोनाचा लढा हा एकजुटीनंच लढला पाहिजे. ही लढाई सर्वांची आहे. सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नागरिक या लढ्यात एकजुटीनं उतरले आहेत ही बाब बळ देणारी आहे. राज्यातल्या, देशातल्या जनतेची एकजूट व कोरोनाविरुद्ध लढण्याचा निर्धारच आपल्याला या लढाईत यश मिळवून देईल, असा विश्वासही अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली ७८१ वर
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?
करोना फोफावतोय; पिंपरी-चिंचवडमध्ये १९, तर मुंबईत ११ जणांना संसर्ग
कोरोनापासून वाचण्यासाठी घरच्या घरी ‘असा’ बनवा मास्क
शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच- केंद्र सरकार