हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “एक वेळ आम्ही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचं समजू शकतो. त्यांना जास्तीची कामं असतात. दुसरे लोक उत्तरं देतात. आम्ही मान्य केलंय. पण गिरीश महाजन का नाही आले सभागृहात. सरळ सांगतात पुढच्या अधिवेशनात घेऊ. पुढच्या अधिवेशनात कोण राहतंय, कोण जातंय माहिती नाही. ही कुठली पद्धत झाली? सगळ्यांचे लाड चाललेत लाड,” अशा शब्दांत अजित पवारांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह काही मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून सरकारवर निशाणा साधला.
आज विधानसभा अधिवेशनाचा शेवटच्या दिवशी विरोधकांनी अनेक मुद्यांवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. विरोधकांनिओ थेट विधानसभा अध्यक्षांच्याच विरोधात अविश्वासाचा ठराव सादर केल्यामुळे राजकीय वातावरण तापले. विधान सभेत आज सदस्यांकडून आलेल्या लक्षवेधी सूचनांवर चर्चा सुरू असताना अजित पवार संतप्त झाले. चार क्रमांकाच्या लक्षवेधीवर चर्चा झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून या लक्षवेधीवर उत्तर अपेक्षित होते. मात्र, गिरीश महाजन सभागृहात उपस्थित नसल्यामुळे तालिका अध्यक्षांनी पाच क्रमांकाची लक्षवेधी पुढे ढकलून सहाव्या क्रमांकाची लक्षवेधी पुकारली. यावरून अजित पवार चांगलेच संतप्त झाले.
“पाच नंबरची लक्षवेधी पुढे का ढकलली? वैभव नाईक इथे बसले आहेत. किती दिवस ती पुढे ढकलताय? आम्हीही मंत्री होतो. आम्ही काय इथे एकदम येऊन बसलो नाहीये. मंत्र्याचं काम आहे इथे यायचं. जर मंत्री नाही आले, तर त्यांना जाब कोण विचारणार?” असा सवाल अजित पवार यांनी भर सभागृहात उपस्थित केला. उपस्थित केला.