हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे. त्यानुसार त्यांनी पोलीस ठाण्यात फडणवीसांना हजर राहण्यास सांगितले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “नोटीशी देण्याची पद्धत राज्यात नव्हती. पण जबाबदार व्यक्तीनेही बोलताना भान बाळगले पाहिजे. लोकांना आरोप-प्रत्यारोप ऐकण्यात अजिबात रस नसतो, असे पवार यांनी म्हंटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस आली आहे. जनतेला राजकारण्यांचे एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप ऐकण्यात अजिबात रस नाही. त्यांना त्यांच्या भागाचा विकास हवा आहे
“प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. नोटीश कशामुळे दिली? माझे एवढंच म्हणणे आहे की, देशात, राज्यात आपल्याकडे अशी परिस्थिती कधीच नव्हती…नोटिसा देणे , वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करणे वगैरे. मी पंतप्रधानांसमोर देखील त्याबाबत वक्तव्य केले आहे. प्रत्येकानं आपापलं काम करावं. जनतेनं ज्यांना पाठिंबा दिला आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं असं माझं मत आहे”, असे पवार म्हणाले.