कोणतीही हुकूमशाही चालणार नाही; अजितदादांनी राज ठाकरेंना सुनावले

Ajit Pawar Raj Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल औरंगाबाद येतील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. त्यांच्यावर टीका केल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंना चांगलेच सुनावले आहे. “राज ठाकरेंनी काल केलेल्या भाषणात भोंग्याबाबत जी वक्तव्य केली, भूमिका मांडली. त्यांची अशा प्रकारची कोणतीही हुकूमशाही चालणार नाही. राज्य घटना, कायदे, नियम सर्वांना सारखे आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस कारवाई करतील, असा थेट इशारा पवारांनी दिला.

अजित पवारांनी आज नाशिक इथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे काम महात्मा फुलेंनी केले आहे. त्यामुळे इतिहास नीट अभ्यासला जावा. आणि राज ठाकरे यांनी उन्हाचा तडाखा, भारनियमन, महागाई, कोळशाचा तुटवडा या प्रश्नांबद्दल बोलावे, असा सल्ला पवार यांनी राज ठाकरे यांना दिली.

शरद पवारांना काय म्हणाले राज ठाकरे?

कालच्या औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले, ‘शरद पवार सांगतात आम्ही दोन समाजात दुही माजवत आहोत. हे देशासाठी, राज्यासाठी चांगलं नाही. शरद पवार जातीजातीत दुही निर्माण करत आहेत, त्याने दुही माजत आहे. मात्र, प्रत्येक व्यक्ती हि जातीतून पाहायची. हातात पुस्तक घेतल्यानंतर अगोदर लेखक पाहायचा. वास्तविक पाहता मी शरद पवार नास्तिक आहे असे म्हण्टल्याने त्यांना ते लागले आहे. माझ्या टीकेनंतर त्यांचे मंदिरांमधील फोटो यायला लागले, असे राज ठाकरे यांनी यावेळी म्हंटले.